Jalgaon Fraud Crime : भुसावळ - कटनी एक्स्प्रेसमध्ये टीसी असल्याची बतावणी करून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या परप्रांतीय दोन तोतया टीसींना आरपीएफच्या मदतीने पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police arrests tc fraudsters jalgaon crime news)
रावेर रेल्वेस्थानकावर बुधवारी (ता.२८) तैनात आरपीएफ कर्मचारी रामब्रेश यांना एका प्रवाशाने भुसावळ- कटनी (डाउन १११२७) एक्स्प्रेसमध्ये टीसी असल्याचे भासवून जनरल डब्यातील तिकीट तपासत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच संबंधित आरपीएफने डब्याची झाडाझडती घेतली असता दोन संशयित आढळून आले.
दोन्ही संशयितांना आरपीएफने पकडून फिर्यादीसमोर हजर केले असता त्यांच्या ओळखीवरून दोन्ही संशयितांना अटक करून आरपीएफ, भुसावळ यार्ड येथे आणले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सौनी विकास साळुंके यांनी संशयितांची चौकशी केली असता त्याने अरविंद तिवारी (वय २६, उचेहरा, जि. सतना), शुभम पांडे (वय २०, रा.पूर्वा, ता. गर्ग, जि. रेवा) असे सांगितले.
तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनंतर दोघा संशयिताना भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुरुवारी (ता.२९) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.