District Superintendent of Police M. the prince In the second photo, a police officer paying his last respects to Viru Shwana. In the last photograph, Viru is being cremated.
District Superintendent of Police M. the prince In the second photo, a police officer paying his last respects to Viru Shwana. In the last photograph, Viru is being cremated.esakal

Jalgaon News : श्‍वान विरूचे शासकीय इतमामात अंत्यविधी; आजाराने घेतला विरूचा बळी

Published on

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलाच्या बाँबशोधक पथकात कार्यरत श्‍वान विरूवर शनिवारी (ता. २) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्हाभरात दाखल होणाऱ्या अनेक गुन्ह्यांत आणि शस्त्रास्त्र बाँबच्या अफवांच्या ठिकाणी विरूने आपले कर्तव्य चोख बजावले आहे.(police dog Viru funeral at government building jalgaon news)

पोलिस दलाचा श्‍वान विरू याला गेल्या काही दिवसांपासून निमोनिया आजाराने ग्रासले होते. त्याचे उपचारही सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने विरूने आज अखेरचा श्‍वास घेतला.

जिल्हा पोलिस दलाच्या बाँबशोधक व नाशक पथकाच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात विरूचा अंत्यविधी पार पडला.

District Superintendent of Police M. the prince In the second photo, a police officer paying his last respects to Viru Shwana. In the last photograph, Viru is being cremated.
Jalgaon News : ‘धाडी’वरील खड्डेप्रश्‍नी फैजपूरकरांची वज्रमूठ; पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत विरूच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर मानवंदना देण्यात आली.

तद्‌नंतर त्याच्यावर शासकीय इतमामात दफनविधी झाला. विरूच्या अचानक जाण्याने श्‍वान प्रशिक्षक आणि हॅन्डलर यांच्यासह बाँबशोधक व नाशक पथकात शोक व्यक्त होत आहे.

District Superintendent of Police M. the prince In the second photo, a police officer paying his last respects to Viru Shwana. In the last photograph, Viru is being cremated.
Jalgaon News : अंजनगाव सुर्जी नागरी बँकेचे जळगाव पीपल्समध्ये विलीनीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.