Jalgaon Crime News : थोड्याशा पैशांसाठी खाकीशी गद्दारी नको करू भाऊ..! शिस्तीच्या खात्यात विश्वासाला तडा

sushik magare, natavar jadhav and shankar jasak
sushik magare, natavar jadhav and shankar jasakesakal
Updated on

Jalgaon Crime News : स्टेट बँक दरोडा प्रकरणात सोमवारी (ता. ५) पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी कर्जत (मुंबई) येथून अटक केली. वर्षभरापूर्वी दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यात मुख्यालयातील एका पोलिसाला अटक झाली.

त्या अगोदर रेशनमाल तस्करी उघडकीस आणणारा कर्तबगार पोलिस रस्ता लूट, दरोडा आणि घरफोडीच्या गुन्ह्यात अडकला. तिघेही सध्या कारागृहात आहेत. (police involvement in criminal incidents are increasing in jalgaon crime news)

पोलिस दलात येण्यासाठी परिश्रम करून नोकरी व प्रतिष्ठा मिळविली अन्‌ थोड्याशा पैशांसाठी पत-प्रतिष्ठेसह खात्याची इभ्रत या गुन्हेगार पोलिसांनी वेशीला टांगली आहे.

पोलिस दलातील १५० ते २०० रिक्त जांगासाठी ५० हजारांवर उमेदवार पोलिस भरतीत प्रयत्न करतात. तासन्‌तास अभ्यास, मैदानी कसरती आणि प्रचंड अंगमेहनत करून स्पर्धेत उत्तीर्ण झाल्यावरच पोलिस खात्यात साधा शिपाई होता येते. उपनिरीक्षक होण्यासाठी याहून अधिक शैक्षणिक अर्हता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा पणाला लावावी लागते.

केवळ थोड्याशा पैशांसाठी आणि क्षणिक आनंदासाठी पोलिस दलातील स्वतः व कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लावण्याची गुन्हेगारीवृत्ती वाढीस लागत असून, ही वृत्ती संपूर्ण पोलिस दलास प्रचंड घातक ठरणार असल्याचे गुन्हेगारी घटनांत सहभागी पोलिसांमुळे समोर येत आहे.

‘रॉबीनहूड’ झाला दरोडेखोर

एमआयडीसी पोलिस ठाण्यात २०१६-१७ ला कार्यरत असलेला सुशील अशोक मगरे याने रेशनमालाची तस्करी उघडकीस आणली. यामुळे मगरे रातोरात पोलिस दलाचा रॉबीनहूड झाला. लगोलग अनडिटेक्टेड क्लीष्ठ खुनाच्या गुन्ह्यातील संशयितासोबत झटापट करत त्याला जेरबंद करून तो पुन्हा प्रकाशझोतात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sushik magare, natavar jadhav and shankar jasak
Jalgaon Crime News : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

एकटाच कर्मचारी वारंवार संपूर्ण पोलिस ठाण्यावर भारी पडू लागल्याने वरिष्ठही त्याच्यावर खुश होते. असे असताना उमाळ्यातील भुरट्या चोरांना घेऊन त्याने चक्क रस्ता लूट आणि घरफोड्यांचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी त्यास गावठी पिस्तुलासह रस्ता लूट करताना मुद्देमालासह पकडले अन्‌ सुशील मगरेचे पितळ उघडे पडले.

नटवरचा झाला नटवरलाल

पाळधी पेट्रोलपंपाजवळ २६ नोव्हेंबर २०२१ ला रात्री आठच्या सुमारास फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार अडवून चौघा दुचाकीस्वारांनी चाकूने हल्ला चढविला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या खुनाचा प्रमुख सूत्रधार जळगाव पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस कर्मचारी नटवर किशोर जाधव (वय ३९) असल्याचे तपासात उघड झाले.

कोरोना काळात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कैदी वॉर्डाच्या शौचालयात लपविलेल्या पिस्तुलाचा शोध लावून नटवर जाधव प्रकाशझोतात आला. भुसावळच्या गँगवारमधील कैद्याचा खून करण्याचा कट आपण उधळून लावल्याचा बनाव त्याने त्यावेळी केल्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

sushik magare, natavar jadhav and shankar jasak
Kirankumar Bakale News : बकालेंमुळे माझा नवरा झाला दरोडेखोर झाला...

फौजदार पोरासह बाप झाला डाकू

मूळ जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील रहिवासी तथा रायगड जिल्ह्यातील कर्जतचे पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक (वय ३९) याने कहरच केला. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्टेट बँकेतील ऑफिसबॉय तथा शालक मनोज रमेश सूर्यवंशी याला हाताशी धरून चक्क बँकच लुटली.

त्यात त्याचा ६९ वर्षीय पिता रमेश राजाराम जासक याने मुलासह स्टेट बँकेवर डाका टाकून मॅनेजर राहुल महाजन याला जखमी करत साडेतीन कोटींचे सोने व साडेसतरा लाखांची रोकड चोरून नेली.

शिस्त गुंढाळून गुन्हेगारी

पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप प्रचंड वाढला आहे. वरिष्ठ अधिकारी कुठल्यातरी नेता-पुढाऱ्याच्या हाताचे बाहुले बनून काम करू लागले आहेत. आयपीएसची सनदप्राप्त अधिकारी जेव्हा नेत्यांकडे लोटांगण घालतो.

त्यावेळेस कर्मचारी थेट त्या नेत्याच्या मांडीवर बसतो. मतदारसंघातील पोलिस असल्याने पुढारीही पाच-पन्नास पोलिसांची टोळीच पोलिस खात्यात चालवतो. हे पोलिस वेगवेगळ्या पद्धतीने या नेत्यासाठी काम करतात.

sushik magare, natavar jadhav and shankar jasak
State Bank Robbery News : उपनिरीक्षकाने बाप-मेहुण्याच्या मदतीने टाकला दरोडा

अशाच पोलिसांची महाराष्ट्र पोलिस दलात चलती असून, खात्याची शिस्त मोडण्याची सुरवात याच कर्मचाऱ्यांनी केली आहे. अवैध धंद्यांचे कलेक्शन, वाळूच्या धंद्यात भागीदारी, वाळूच्या वाहनांतून चोऱ्यांसह इतर गुन्हे करण्यात हे पोलिस काहीच गैर मानत नाहीत.

"कर्मचारीच महाराष्ट्र पोलिस दलची आन-बान-शान आहे. कारण तो सामान्य जनतेशी जसा वागतो तशी प्रतिमा संपूर्ण पोलिस दलाची होते. पोलिस दलच त्याचे कुटुंब असून, त्याचा कुटुंबप्रमुख शिस्तप्रिय असला तरच कर्मचारीही शिस्तीत राहतो.

आज मात्र विपरित घडतयं. वरपर्यंत लागेबांधे असलेले कर्मचारी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मनाप्रमाणे वागू दिले नाही, तर जेरीस आणतात. अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्थेसह आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळताना मोठी कसरत करावी लागते." -डी. डी. गवारे, निवृत्त उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

sushik magare, natavar jadhav and shankar jasak
Jalgaon Crime News : अवघ्या 17 मिनिटांत बँक लूटून दरोडेखोर पसार; रक्तबंबाळ बँक मॅनेजरला तिजोरीत कोंडले..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()