Jalgaon News : तोंडाला रुमाल बांधलेले दोन दहशतवादी रेल्वे आरक्षण कार्यालयात घुसले आहे आणि त्यांच्याजवळ एक काळी बॅग असल्याचा दूरध्वनी लोहमार्ग पोलिसांना आला. माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
लगेचच चाळीसगाव शहर पोलिस, बीडीडीएस, क्यूआरटी, आरसीपी, आरपीएफ पथकाला पाचारण केले. सोबतच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाली. पोलिसांनी लगेचच परिसराची नाकाबंदी केली. (police performed mock drill of terrorist attack on chalisgaon railway station jalgaon news)
रेल्वेस्थानकात पळापळ झाली. सर्व प्रवाशांचे श्वास रोखले गेले. त्यानंतर क्यूआरटी टीमने तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या दोघा दहशतवाद्यांना जिवंत पकडून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेऊन त्यांच्याकडे असलेली शस्त्रे जप्त केली. मात्र, रेल्वेस्थानकावरची थरारक घटना खरी नसून लोहमार्ग पोलिसांनी मॉक ड्रिल केल्याचे जेव्हा प्रवाशांना समजले, तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील सफाई कामगार महेंद्र मोरे याने दूरध्वनीद्वारे रेल्वे पोलिसांना संपर्क करून आरक्षण कार्यालयात तोंड बांधून दोन दहशतवादी घुसले आहेत. त्यांच्याकडे काळी बॅग आहे, अशी माहिती दिल्यावरून तत्काळ रेल्वेचे अधिकारी आरक्षण कार्यालयाकडे रवाना झाले.
त्यापूर्वी नियंत्रण कक्ष लोहमार्ग (औरंगाबाद) यांना माहिती दिली तसेच चाळीसगाव शहर पोलिस ठाणे बीडीडीएस, क्यूआरटी पथक, राज्य राखीव, केंद्रीय राखीव, रेल्वे पोलिस दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांना माहिती देऊन मदतीसाठी घटनास्थळी प्राचारण केले. त्यानंतर परिसराची नाकाबंदी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
क्यूआरटी पथक घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले दोघांना ताब्यात घेत ही मॉक ड्रील यशस्वीपणे पार पाडली. मॉक ड्रील पूर्ण झाल्यावर शहर पोलिस ठण्याचे पोलिस कर्मचारी, क्यूआरटी, आरसीपी, बीडीडीएस यांची फॉलिंग घेऊन घटनास्थळावरुनच त्यांना त्यांच्या मुख्यालयास परत रवाना करण्यात आले.
या मॉकड्रिलमध्ये लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किसन राख, पोलिस उपनिरीक्षक शब्बीर शेख, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते, सहाय्यक फौजदार सुनील सावळे, पोलिस कर्मचारी राजेश पाटील, गोपाल सोनवणे, जितेंद्र वाघ, फरीद तडवी, मोहसीन सय्यद, दिनेश पाटील, राहुल शार्दुल, राजेंद्र कोळी, मिलिंद मोहिते, गणेश हिवराळे आदी उपस्थित होते.
घटनास्थळी असे होता फौजफाटा
या मोहिमेत घटनास्थळावर पोलिस उपनिरीक्षक मोहिते व ३ अधिकारी १० पोलिस अंमलदार, शहर पोलिस ठाणे चाळीसगाव येथून सहायक पोलिस निरीक्षक टकले, पोलिस उपनिरीक्षक माळी व १० अंमलदार, आरपीएफ पोस्ट चाळीसगाव येथून निरीक्षक सुनीलकुमार सिंह, सहायक फौजदार बच्छाव, सहायक फौजदार पांढरे व २ अंमलदार, बीडीडीएस जळगावचे पोलिस उपनिरीक्षक कवडे व ८ कर्मचारी, क्यूआरटी जळगावचे १३ अंमलदार, आरसीपी जळगावचे पोलिस उपनिरीक्षक पवार व १६ अंमलदार, अग्निशमन दलाचे फायरमन राजू जाधव व वाहनचालक सुनील पाटील फायरब्रिगेडचे वाहनासह यांनी सहभाग घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.