जामनेर : भारतीय जनता पार्टीमधील माझ्या तब्बल चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात मी कधीही कुणाचा द्वेष अथवा घाणेरडे राजकारण केले नाही, मात्र ज्यांना राजकारणात जन्माला घातले त्यांनीच जागो-जागी नाथाभाऊंचा अनेक वर्ष छळ केला,अशा शब्दात राष्ट्रवादीचे जेष्ठनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नाव न घेता माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचेवर टिकास्त्र सोडले.
राष्ट्रवादी परीवार संवादयात्रे निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमामधे श्री. खडसे बोलत होते. या संवादयात्रेच्या कार्यक्रमामधील मुख्य वैशीष्ठ म्हणजे सर्वच्या-सर्व वक्त्यांच्या भाषणातून गिरीश महाजनांवर रोष व्यक्त केला जात होता. त्यामुळे उपस्थितांचे राजकीय ज्ञानार्जना ऐवजी चांगलेच मनोरंजन झाल्याचे पहायला मिळाले.
पहुर रस्त्यावरील मंगल कार्यालयात आयोजीत कार्यक्रमाच्या व्यासपिठावर संवाद यात्रेचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सरगर, सुनील गव्हाणे, सुरज चव्हाण,रवीकांत वर्पे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर,दिव्या भोसले,सक्षणा पाटील,जेष्ठ नेते संजय गरूड,प्रमोद पाटील,अॅड रवींद्र पाटील , तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,वंदना चौधरी,विलास राजपुत,गफ्फार मलीक,गुलाबराव देवकर, अभिषेक पाटील, जितेश पाटील,संदिप हिवाळे,डि के पाटील,जिल्हाबँकेच्या अध्यक्षा रोहीणी खडसे,कृष्णा माळी,प्रल्हाद बोरसे,मनीष जैन,प्रभु झाल्टे आदी जेष्ठनेते-पदाधीकारी उपस्थित होते.
ईडी लावली, आता माझ्या टप्यामध्ये आले आहे..
रात्री तब्बल बारा वाजेच्या दरम्यान जयंत पाटीलांचे एकनाथ खडसेंसोबत कार्यक्रमस्थळी आगमन झाले होते, तरीही कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. मी म्हणालो होतो "माझ्या मागे ईडी लावाल तर आपण सिडी काढु" आता ईडी लागली, माझ्या टप्यामधे आले आहे असा सुचक ईशारा देऊन एकनाथ खडसे म्हणाले, की आता बारा वाजवायचे आहे, वचपा काढायचा आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी हातात हात घालुन पक्षसंघटन मजबुत करायचे असे शेवटी आपल्या भाषणात सांगीतले.
2024 मधे संजय गरूड यांना आमदार करायचे
संवांद यात्रेचे मुख्यकेंद्रबिंदु जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाच्या स्थानीक पदाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारून येत्या 2024 मधे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे संजय गरूड यांना आमदार करायचे आहे, त्यासाठी आतापासुनच कामाला लागुन दरम्यानच्या काळात येणाऱ्या सर्वच्या-सर्व निवडणुकांमधे राष्ट्रवादीचे जास्तीत-जास्त लोक कसे निवडुन येतील यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले. तर संजय गरूड यांनी मतदार संघातील विवीध समस्यांचा आढावा घेऊन असंख्य प्रकल्पग्रस्तांच्या परताव्याचा मुद्दा जलसंपदामंत्र्यांकडे लाऊन धरला. उपस्थितांमधुन तालुक्यातील बहुतांश कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी दहा-पंधरा वर्ष झाले तरी त्यांची बदली कशी काय होत नाही असा कळीचा मुद्दा जयंत पाटीलांसमोर मांडला.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.