शिवसेनेने भाजपचा पून्हा 'करेक्ट' कार्यक्रम लावला; तीन नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता
Shiv sena
Shiv senaShiv sena
Updated on

जळगाव ः जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) आज पून्हा शिवसेनेने भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे तीन नगरसेवकांनी आज मुंबई गाठत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला शिवसेनेकडून वारंवार झटका दिला जात आहे. त्यात जळगाव महापालिकेवरील शिवसेनेचे आणखी संख्या बळ वाढल्याने ताकद वाढली आहे.

(jalgaon municipal corporation three bjp corporators joined shiv sena)

Shiv sena
नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा

एप्रील महिन्यात जळगाव महापालिकेत मोठा राजकीय भुकंप होवून संत्तातरण झाले होते. भारतीय जनता पार्टीच तब्बल २७ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आणि महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर भाजपमधील फुटलेले नगरसेवकांमधून कुलभूषण पाटील उपमहापौर झाले होते. त्यात तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आज जळगाव महापालिकेतील तीन नगरसेवक यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या वर्षा बंगल्यावर शिवेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यात नगरसेविका शोभा दिनकर बारी व शेख हसीना बी शेख शरीफ तर नगरसेवक सुरेश माणिक सोनवणे यांचा समावेश आहे.

Shiv sena
महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

पुन्हा राजकीय खळबळ

मुक्ताईनगर नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी तीन-चार दिवसापूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यात आज दुपार पासून जळगाव महापालिकेतील काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. सायंकाळी तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.