जळगाव ः जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याने गिरीश भाऊंना जो झटका बसला त्यामुळे त्यांना 'ईडी' आठवण आता येवू लागली आहे. आणि 'ईडी; लावून छळण्याचा प्रकार कोण करतात, हे सर्व जगाला माहिती आहे, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) केलेल्या आरोपावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय महिला रुग्णालयाच्या पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर 'ईडी'ची तारीख आल्यावरच त्यांना कोरोना कसा होतो ? असा आरोप केला होता. या आरोपावर बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले, की गेले विस दिवसापासून कोरोना झाल्यामुळे मी बाँम्बे हाॅस्पीटमध्ये कोरोनाचा उपचार घेत होतो. मला खुप त्रास झाला आणि मला जाणीव आहे कोरोनामध्ये किती त्रास होतो. त्यामुळे मला काही नौटंकी करण्याची सवय नाही.
सत्ता गेल्याने बसला झटका
महापालिकेत भाजपची सत्ता गेल्याने गिरीश महाजनांना झटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आता 'ईडी'ची आठवण येवू लागली आहे. 'ईडी' तुम्हीच लावता, दुसरे कोण लावणारे आहे. आणि तुम्हीच 'ईडी' लावून छळ करता हे जगाला माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.