Jalgaon Unseasonal Rain Damage : राष्ट्रीय महामार्गावरील वंजारी रस्त्यालगत असलेल्या अंडरपासमध्ये अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह येथील नागरिकांना पाण्यामधून ये-जा करावी लागत आहे.
दरम्यान, याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही डोळेझाक केली जात असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनी महामार्ग प्राधिकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.(ponds accumulating in underpass are causing problems for residents of Parola jalgaon news)
शहरापेक्षा नवीन वसाहतीत सुविधा मिळतील, या आशेने शहरातील नागरिकांनी बायपासलगत नवीन वसाहतीत जागा घेऊन त्या परिसरात निवाऱ्याची व्यवस्था केली.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात हद्दवाढ न झाल्यामुळे अनेक संकटांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यात महामार्ग ‘बायपास’ झाल्यानंतर येथील रहिवाशांना शहरात जाता यावे, यासाठी वंजारी रस्त्यालगत अंडरपास व्हावा, यासाठी
लोकप्रतिनिधी व महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून अंडरपास करण्यात आला. मात्र, या अंडरपासमध्ये अनेक त्रुटी आहेत. या ठिकाणी पथदीपांची व्यवस्था न झाल्यामुळे रात्रीच्या वेळी जाणे महिला वर्गाला जिकिरीचे बनते.
त्यातच अवकाळी पावसाचे पाणी अंडरपासमध्ये साचल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होऊन ये-जा करण्यासाठी पादचारी व वाहनधारकांना कसरत करून जावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
या अंडरपास मध्ये पथदिवे, ये-जा करण्यासाठी सोयीचा रस्ता याची गरज असून, या जिव्हाळ्याच्या विषयाकडे महामार्ग प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.