Jalgaon News: पाचोऱ्यात मुद्रांक विक्रेत्यांची दैन्यावस्था! घाणीत बसून कामकाज

Stagnant water and filth everywhere in the work place of stamp sellers.
Stagnant water and filth everywhere in the work place of stamp sellers.esakal
Updated on

Jalgaon News : येथील मुद्रांक विक्रेत्यांना पडक्या इमारतीच्या परिसरात तसेच अक्षरशः घाणीमध्ये बसून कामकाज करावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

संबंधित यंत्रणेने मुद्रांक विक्रेत्यांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ थांबवावा व शासकीय नियमानुसार तहसील कार्यालयाच्या आवारातच त्यांच्या बसण्याची व कामकाजाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. (poor Condition of stamp sellers in Pachora Working in dirt Jalgaon News)

शासनाचा विक्रमी महसूल वसुलीचे काम करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेची दैन्यावस्था झाली आहे. नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत शासकीय कागदपत्रे तयार करून घ्यावी लागत आहेत.

या गंभीर प्रकाराकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शासकीय कामकाजासाठी तालुक्यातील १२९ खेड्यांसह शहरातील नागरिक विविध प्रकारचे दाखले व कागदपत्रे तयार करण्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे येतात.

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अधिकृत जागा असताना मुद्रांक विक्रेत्यांना जुन्या पडक्या पालिका रुग्णालय इमारतीच्या आवारात अनधिकृतपणे बसून कामकाज करावे लागते. या परिसरात डास, चिलटे, दुर्गंधी, चिखल आदींचा त्रास आहे.

त्यातच महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल व पाण्यातून वाट काढत स्टॅम्प वेंडरांकडे स्टॅम्प घेण्यासाठी व विविध कागदपत्रे तयार करण्यासाठी जावे लागते.

मुद्रांक विक्रेते तर दिवसभर तेथे बसून असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिका रूग्णालयाची पडकी इमारत धोकेदायक असून केव्हाही दुर्घटना घडण्याची भीती आहे.

मुद्रांक विक्रेत्यांनी आपल्या बैठक व्यवस्थेची आमदार किशोर पाटील यांच्याकडे वारंवार मागणी करुनही अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली नसल्याने नाराजी पसरली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Stagnant water and filth everywhere in the work place of stamp sellers.
Clean River, Save Water : नदी स्वच्छता, पाणी वाचवाचा संदेश देत नाशिकचे सुभाष जांगडा धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर!

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

मुद्रांक विक्रेते सध्या ज्या घाणीमध्ये कामकाज करीत आहेत, त्या जागेची मालकी पालिकेची आहे. ही इमारत पडक्या अवस्थेतील आहे.

या ठिकाणी पालिकेकडून कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही. कचऱ्याचे ढीग साचलेले असून सर्वत्र पाणी तुंबलेले आहे. सद्यःस्थितीत किमान पालिकेने या जागेची स्वच्छता तरी करावी, अशी मागणी होत आहे.

मुद्रांक विक्रेत्यांची मागणी

मुद्रांक विक्रेते सुरवातीला तहसील कार्यालयाच्या समोरील जागेवर बसत होते. तत्कालीन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी या भागातून त्यांना काढल्यानंतर ते पालिकेच्या जुन्या रुग्णालयाच्या आवारात बसून कामकाज करू लागले.

त्यावेळी मुद्रांक विक्रेत्यांनी मोर्चा, उपोषण आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचे हाल होत आहेत. न्यायासाठी वारंवार मागणी करून, निवेदने देऊनही शासनाच्या अधिकृत मुद्रांक विक्रीसाठी तहसीलच्या आवारात जागा दिली जात नाही.

त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याने आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी या ‍संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी व अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना शासन नियमानुसार तहसील कार्यालयाच्या आवारातच जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुद्रांक विक्रेत्यांनी केली आहे.

"तहसील कार्यालयाच्या आवारात शासनमान्य २० परवानाधारक अधिकृत स्टॅम्प वेंडर आहेत. त्यांनी वारंवार जागेची मागणी करूनही त्यांना जागा मिळालेली नाही. तहसीलच्या आवारातच जनतेला मुद्रांक विक्री करण्याचा विक्रेत्यांना अधिकार आहे. मात्र, आम्ही अनधिकृत जागेत बसून कामकाज व मुद्रांक विक्री करतो. ही बाब जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याही लक्षात आणून दिली असून त्यांनी शासन नियमानुसार जागा देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्याची तहसीलदारांनी दखल घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे."

- शामकांत सराफ, उपाध्यक्ष ः मुद्रांक विक्रेता महासंघ, पाचोरा

Stagnant water and filth everywhere in the work place of stamp sellers.
Gurumauli Annasaheb More: अध्यात्मातून राष्ट्रविकास साधा : गुरुमाऊली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.