Jalgaon Postal Court : तक्रारींच्या निराकरणासाठी जळगावात 'या' तारखेला डाक अदालत

India Post News
India Post Newsesakal
Updated on

Jalgaon Postal Court : टपाल कार्यालयाच्या कामांबाबत तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी जळगाव विभाग अधीक्षक डाकघर (Jalgaon Postal Court) यांच्यातर्फे गुरुवारी (ता. १३) दुपारी चारला कार्यालयात डाक अदालत होणार आहे. (postal court will be held on 13th April by Divisional Superintendent of Post Office jalgaon news)

अदालतीत टपाल वस्तू, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते प्रमाणपत्र यासंदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलांसह करावा.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

India Post News
Girish Mahajan : जळगावात सिमेंटच्या गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे ‘नेटवर्क’ : गिरीश महाजन

संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत ‘अधीक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह १० एप्रिलपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. तद्‌नंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल. मात्र, त्यांचा डाक अदालतीत विचार केला जाणार नाही, असे डाकघर कार्यालयाच्या अधीक्षकांनी कळविले आहे.

India Post News
Crop Competition : राज्यातंर्गत पीक स्पर्धेत जळगाव चमकले; हे आहेत पीक स्पर्धेत निवड झालेले शेतकरी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.