Jalgaon Damage Road: जळगाव- भुसावळ महामार्गावर खड्डेच खड्डे! रात्रीचे पथदिवे बंद, साइडपट्ट्या नाहीत

येथील कालिकामाता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंत गतवर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले.
Potholes on the highway between Kalikamata Temple and Tarsod Fatya
Potholes on the highway between Kalikamata Temple and Tarsod Fatyaesakal
Updated on

जळगाव : येथील कालिकामाता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंत गतवर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले.

आता वर्ष होत नाही तोपर्यत रस्त्यात खड्डे पडले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नागपूरकडून धुळ्याकडे जाणारी, जळगावला येणारी वाहनांची गर्दी याच रस्त्यावर होते. बहुतांश वाहने अवजड असतात.

महामार्गाचे डांबरीकरण झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डेपडून रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. (Potholes on Jalgaon Bhusawal Highway Night street lights off no sidebar jalgaon damage road news)

गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळील महामार्गावर पुलाचा तुटलेला कठडा.
गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळील महामार्गावर पुलाचा तुटलेला कठडा.esakal

कालिकामाता मंदिरापुढे भुसावळकडे जाताना कमल पॅराडाईज हॉटेलसमोरच महामार्गावर खड्डा पडला आहे. पुढे खेडी गावाच्या अलीकडे नाल्यावरील पुलावरील रस्ता उखडून गेला आहे. गोदावरी अभियांत्रीकीजवळील ‘एमआयडीसी’ त वळणाऱ्या महामार्गाच्या अलीकडे पूल आहे.

त्यावरील दोन्ही बाजूंचे सरंक्षक कठडे तुटलेले आहेत. ते कठडे रस्त्याच्या डांबरीकरण व दुरूस्तीकरणात बांधण्यात आलेले नाही. रात्री येथे पथदिवे नसल्याने अपघाताचा मोठा धोका आहे.

वाहन थेट कठड्यावरून नाल्यात पडू शकते. महामार्गाने भुसावळकडे जाताना टी. व्ही. सेंटरच्या पुढे रस्त्याच्या मध्येच आठ ते दहा फुटाचा लांबलचक रस्ता उखडून खड्डा तयार झाला आहे. लहान वाहनधारकांची वाहने या खड्ड्यात अडकतात यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे.

Potholes on the highway between Kalikamata Temple and Tarsod Fatya
SAKAL Impact : जळगाव जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटसह अवैध धंद्यावर धडक कारवाई करा; नियोजन समिती बैठकीत पालकमंत्र्यांचे आदेश

साइडपट्या नसल्याने अपघात

कालिका माता मंदिर ते तरसोद दरम्यानच्या महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साइडपट्ट्या नाहीत. ज्या आहेत त्या कच्च्या आहेत. दुचाकीचालकांना वाहने चालविण्यासाठी साइडपट्या नसल्याने त्यांना महामार्गावरून मोठ्या वाहनांचा त्रास सहन करीत वाहने चालवावी लागतात.

महापालिकेने पूर्वी या मार्गावर पथदिवे लावले होते. ते नेहमी बंद असतात. महापालिका नागरिकांकडून पथदिवेकर वसूल करते मात्र पथदिवे का लावत नाहीत असा प्रश्न नागरिकांना आहे.

रस्ता तयार केल्यानंतर किमान तीन वर्ष तो टिकला पाहिजे. अथवा खराब झाला तर लागलीच तो दुरुस्त करायला पाहिजे, असा नियम सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ते तयार करताना आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे का दुर्लक्ष करते आहे, याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

Potholes on the highway between Kalikamata Temple and Tarsod Fatya
SAKAL Impact: तळोदा-बऱ्हाणपूर महामार्ग रावेरकडून जाणार; जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.