Power Distribution Strike : वीजवितरण कर्मचाऱ्यांचा सरकारला संपाचा Shock!

Engineers and employees of Mahavitran while giving statement of demands.
Engineers and employees of Mahavitran while giving statement of demands.esakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : येथील वीज वितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात ७२ तासांचा संप करून गिरड रस्त्यावरील विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात मागण्या व एकजुटीसंदर्भात घोषणाबाजी करून ठाण मांडले आहे. (Power Distribution Strike Shock of power distribution employees strike to government jalgaon news)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Engineers and employees of Mahavitran while giving statement of demands.
Dhule News : साक्रीच्या फळांची आखाती देशांत गोडी अन् डाळिंब, सीताफळ उत्पादक झाले लखपती!

शासनाने वीज वितरणच्या खासगीकरणाचा घाट घातला असून, अभियंते व कर्मचारी या धोरणाच्या विरोधात जाऊन संप आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन अभियंते व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी नसून वीज ग्राहक व कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे.

खासगीकरण झाल्यास वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल, अशा प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त करून आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
गिरड रस्त्यावरील महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी कामगार एकजुटीचा जयघोष करत मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करून न्यायाची मागणी केली.

दरम्यान, तीन दिवसांच्या संपामुळे वीजपुरवठा बंद होऊन हाल व मनस्ताप सोसावा लागण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. संपकरी महावितरण कर्मचाऱ्यांची विविध राजकीय पक्ष तसेच सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शवला.

Engineers and employees of Mahavitran while giving statement of demands.
SAKAL Impact | उपस्थिती भत्ता किमान प्रतिदिन 20 रुपये द्या: धनंजय मुंडेंचे शिक्षणमंत्री केसरकरांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.