जळगाव : जिल्ह्यात वीजबिल भरण्याचे ग्राहकांचे प्रमाण चांगले आहे. बिल प्रामाणिकपणे भरले जात असले तरी जिल्ह्यात विजेचा अनधिकृत वापर, विजेची चोरी, शॉर्टसर्किट यामुळे होणारे गळतीचे प्रमाण २४.२३ टक्के आहे. या गळतीचा महावितरणला मोठा फटका बसत असून, त्यामुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही मूळ बिलापेक्षा २४ टक्के अतिरिक्त बिल भरावे लागते असेच म्हणावे लागेल.
वीज कंपनीचा जो ग्राहक प्रामाणिक वीजबिल भरेल, त्याला महावितरणकडून २४ तास वीज दिली जाते. त्यासाठी ए., बी., सी., डी., ई आणि एफ असे फीडरचे भाग करण्यात आले आहेत. यात डी. ई व एफ या फीडरवर अधिक भारनियमन केले जाते. मात्र सध्या राज्यात कोठेही भारनियमन होत नाही. असे असले तरी गळतीचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गळतीचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडत आहे. यामध्ये जळगाव परिमंडलाची वितरण हानी २४.२३ टक्के आहे.
साडेनऊ कोटींची वीजचोरी
आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांस मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यात जळगाव परिमंडळात एप्रिल-२०२१ ते डिसेंबर-२०२१ या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. नऊ महिन्यांत सहा हजार १३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून साधारण ६७ लाख ९९ हजार ७८१ युनिटद्वारे नऊ कोटी ४० लाखांची वीजचोरी केली आहे.
खानदेशातील वीजचोरी
जिल्हा प्रकरण युनिट वीजचोरीची रक्कम
जळगाव ४३६३ ५२ लाख ६२ हजार ५७५ सहा कोटी ९८ लाख
धुळे ९१५ ७ लाख ५६ हजार २३६ एक कोटी पाच लाख
नंदुरबार ७३५ ७ लाख ८० हजार ९७० एक कोटी ३६ लाख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.