Pradhan Mantri Garib Kalyan Yojana : मोफत अन्नधान्य आता डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार

Pradhan Mantri Garib Kalyan Yojna
Pradhan Mantri Garib Kalyan Yojnaesakal
Updated on

जळगाव : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य लाभाच्या योजनेची मुदत सप्टेंबरपर्यंत होती. या योजनेस पुन्हा तीन महिने म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने मोफत धान्यवाटपासाठी गहू आणि तांदळाचा साठा जिल्हा प्रशासनाकडे मंजूर केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

राज्यासह देशभरात मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. यानंतर देशभरात निर्बंध लावण्यात आले होते. यादरम्यान गोरगरीब सर्वसामान्यांच्या रोजगारावर परिणाम झाला होता.

त्यांची अन्नधान्याची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. त्यानुसार अंत्योदय व प्राधान्य गटातील सुमारे २८ लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानदारांच्या माध्यमातून मार्च-एप्रिल २०२० पासून मोफत धान्यवाटप करण्यात आले.(Pradhan Mantri Garib Kalyan Yojana Free Food grains now available till end December Jalgaon News)

Pradhan Mantri Garib Kalyan Yojna
Crime News : फटाका दुकानदारालाच लावले चोरट्यांनी फटाके अडीच लाखांची रोकड लंपास

यात राज्य शासनाने मे व जून २०२१ मध्ये मोफत धान्यवाटपाची योजना जाहीर केली होती. या योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेस टप्प्याटप्प्याने सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती.

त्यानंतर आता या योजनेस पुन्हा तीन महिने डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबत शासनाने मोफत धान्यवाटपासाठी गहू व तांदळाचा साठासुद्धा मंजूर करण्यात आला आहे. अंत्योदयअंतर्गत सुमारे सहा लाख ३० हजार, तर प्राधान्य गटात २१ लाख ४७ हजारांहून अधिक असे सुमारे २८ लाख योजनानिहाय जिल्ह्यातील लाभार्थी आहेत.

असे होणार वितरण

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत पाच किलो तांदूळ दिला जात होता. त्यात बदल होऊन तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे वितरित करण्यात आले आहे; परंतु ऑक्टोबरपासून पीएमजीकेएवाय फक्त अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनासाठी आहे. केशरी एपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी नाही. अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना एक किलो गहू व चार किलो तांदूळ, तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना चार किलो गहू व तीन किलो तांदळाचे वितरण केले जाणार आहे, असे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.

Pradhan Mantri Garib Kalyan Yojna
Agriculture Innovation : ट्रॅक्टरप्रमाणे शेतकऱ्याच्या हाती देणार ड्रोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.