PM Awas Yojana : सावद्यात 149 कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल! लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान

Beneficiary with Gharkula constructed within the municipal limits under Pradhan Mantri Gharkul Yojana.
Beneficiary with Gharkula constructed within the municipal limits under Pradhan Mantri Gharkul Yojana. esakal
Updated on

PM Awas Yojana : पालिका हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) आजपर्यंत एकूण २ डीपीआर मंजूर झाले आहेत. एकूण १४९ प्रस्ताव मंजूर झाले असून, त्या पैकी ७६ घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहेत. यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

याबाबत पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सावदा पालिकेचे २ प्रकल्प अहवाल मंजूर झालेले आहेत.

त्यानुसार केंद्रस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती (सीएसएमसी) अंतर्गत पहिल्या टप्प्यात १०८ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. त्यात ७६ घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. (Pradhan Mantri Gharkul Yojana total of 149 proposals were approved jalgaon news)

उर्वरीत ३२ लाभार्थी हे अपात्र तसेच लाभ घेण्यास नकार दिल्याने त्यांचे नावे वगळण्याचे प्रस्ताव म्हाडास मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. या प्रकल्पास राज्य शासनाचा ७६ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, ७६ लाभार्थ्यांना ७६ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

तसेच केंद्रशासनाचा पहिला व दुसरा हप्ता ११ लाख २० हजार रुपये प्राप्त झाला असून, संपूर्ण निधी लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रगतिनुसार वितरीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केंद्रशासनाकडून प्राप्त होणारा तिसरा हप्ता अद्याप कार्यालयास प्राप्त झाला नसल्याने वितरीत झालेला नाही.

केंद्रस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती १७ फेब्रुवारी २०२१ अंतर्गत दुसरा १०८ लाभार्थ्यांचा अहवाल मंजूर झाला असून, ६५ लाभार्थ्याचे काम प्रगतिपथावर आहे. तरी सदर प्रकल्प अहवालास राज्यशासनाचा प्रथम हप्ता प्रति लाभार्थी १ लाख याप्रमाणे १ कोटी ८ लाख रुपये प्राप्त झाले असून ६४ लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रगती नुसार निधी वितरीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beneficiary with Gharkula constructed within the municipal limits under Pradhan Mantri Gharkul Yojana.
Jalgaon News: कपाशीवरील ‘लाल्या’वर युरियाच्या फवारण्या करा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांची माहिती

केंद्रशासनाचा पहिला हप्ता ६४ लाख ८० हजारांचा निधी प्राप्त झाला असून, संपूर्ण निधी लाभार्थ्यांना बांधकामांच्या प्रगतीनुसार प्रथम हप्त्यामधून दुसरा हप्ता सुद्धा वितरीत करण्यात झालेला आहे. केंद्र शासनाचा दुसरा व तिसरा हप्ता कार्यालयास अद्यापही प्राप्त झालेला नाही.

तसेच ४९ लाभार्थ्यांचा प्रकल्प अहवाल केंद्रस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, त्याला अद्यापही मान्यता मिळालेली नाही, अशी एकूण १४९ प्रकरणे मंजूर असून, त्यापैकी १४१ लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली आहे.

त्यापैकी ७० घरकुले पूर्ण झाली असून, ७१ लाभार्थ्यांचे काम प्रगतिपथावर आहे. केंद्र शासनाच्या या बांधकामांचे जीओ टॅगिंग ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येते व केंद्र शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक सलन खात्यात परस्पर वर्ग करण्यात येते. आजपर्यंत बांधकाम परवानगी घेण्याबाबत पालिकेने वेळोवेळी बांधकाम परवानगी वितरण मेळावे आयोजित केलेले आहे.

२५ जून २०१५ ला प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली. २०२२ पर्यंत सर्व पात्र कुटुंबांना पक्के घर सुनिश्चित करून भारतातील शहरी भागातील घरांची कमतरता दूर करणे हे पीएमएवाय अर्बन मिशनचे उद्दिष्ट आहे.

Beneficiary with Gharkula constructed within the municipal limits under Pradhan Mantri Gharkul Yojana.
Anil Bhaidas Patil: आता माघार नाही... 3 पक्षांसोबत आगामी निवडणुका : मंत्री अनिल पाटील

एकूणच पीएमएवाय-यू मिशन अंतर्गत २० दशलक्ष घरे बांधण्याची सरकारची योजना आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वीच्या मुदतीनुसार नागरी योजना आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी प्रधानमंत्री आवास योजनेचा गरजू लोकांनी घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.

"प्रधानमत्री आवास योजनेचे उद्दिष्ट्य पुढील ३ महिन्यात १०० टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या १० ते १२ तारखेच्या दरम्यान लाभार्थी मेळावा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन तसेच ज्या लाभार्थ्यांनी अद्याप घरकुल बांधकाम सुरू केले नाही, त्यांना बांधकाम सुरू करण्याबाबत प्रोत्साहन मेळावा घेण्याबाबतचा पालिकेचा मानस आहे."- विनय अभियंता विनय खक्के

"प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्राप्त अनुदानामुळे आमचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. घरकुल पूर्ण झाले असून, नवीन घरात आम्ही निवास करत आहोत. या योजनेचा फायदा आम्हाला मिळण्यासाठी सावदा नगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांचे उत्तम सहकार्य मिळाले आहे." - महावीर सैतवाल, लाभार्थी, साईपार्क, सावदा

Beneficiary with Gharkula constructed within the municipal limits under Pradhan Mantri Gharkul Yojana.
Jalgaon News : अत्याचाराच्या घटनांबाबत लोकगीतातून सरकारला आर्त हाक! राजू साळुंखेंनी व्यक्त केल्या भावना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.