Prakash Ambedkar : नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नव्हे तर तमाशा सुरू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर जळगाव दौऱ्यावर असून, शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी कोण आहेत हेच कळत नाही. (Prakash Ambedkar comment on winter session in Nagpur jalgaon news)
ज्वलंत प्रश्नावर सभागृहात चर्चा होताना दिसत नाही, ज्या प्रश्नाचे महत्त्व नाही त्यावर चर्चा होत आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना बियाणे खराब मिळाले आहे, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्नच राज्यकर्त्यांना दिसत नाहीत.
संसदेत बेरोजगारीच्या प्रश्नावर युवकांनी उडी मारली त्या बेरोजगारीच्या प्रश्नावरही चर्चा होताना दिसत नाही. विरोधकांनी जे प्रश्न विचारायचे आहेत ते सत्ताधारी विचारीत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी जे सांगायचे आहे, ते विरोधक सांगत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण शक्य
मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते, तेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, याबाबतचा तोडगा आपल्याकडे आहे. परंतु या सरकारला तो आपण सांगणार नाही.
माझ्याकडे मराठा आरक्षणाचा असलेला तोडगा सरकारला सांगितला, तर ते त्याचे खोबरं करून टाकतील. त्यामुळे आपण राज्यात नवीन येणाऱ्या सरकारला तो निश्चित सांगू. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण निश्चित देता येऊ शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक
‘इंडिया’ आघाडीच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडीचे आमंत्रण आले तर आपण निश्चित बैठकीस जाणार आहोत. शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधाबाबत बोलताना त्यांनी आमचे वर्षभरापूर्वीच ठरलेले आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले.
गिरीश महाजन यांना आव्हान
मराठा आरक्षणाबाबत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्याचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोनी यांनी मराठा आरक्षणाची बाजू उच्च न्यायालयात यशस्वीपणे मांडली. परंतु, सुप्रीम कोर्टात त्यांना बाजू मांडण्यापासून का रोखण्यात आले, त्यांनी न्यायालयात हजर राहू नये असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदेश का दिले, याबाबतचे उत्तर गिरीश महाजन यांनी अगोदर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.