Jalgaon Prakash Ambedkar: लोकसभेच्या 30 जागा भाजपला मिळू देऊ नका

Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

Jalgaon Prakash Ambedkar: ‘येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा निश्चय करा, राज्यात लोकसभेच्या ४५ पैकी ३० जागा भाजला मिळू न देण्याचा संकलप करा असे आवहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केले.

पक्षाच्या प्रदेशाध्याक्षा रेखाताई ठाकूर, युवक आघडीच्या शमिभा पाटील, चेतन गांगुर्डे, प्रमोद इंगळे, वंदना सोनवणे, माई पाटील, प्रा. सी. पी. लाभणे आदी उपस्थित होते. (Prakash Ambedkar statement Do not let BJP get 30 Lok Sabha seats jalgaon news)

श्री. आंबेडकर म्हणाले, भाजप सरकारला पराभूत करण्याचा केवळ संकल्प करून भागणार नाही, तर प्रत्येक मतदारपर्यंत पोहचून आपली भूमिका समजावून सांगण्याची गरज आहे. सरकारच्या विरोधी मतदान करणारे कोण आहेत याचा विचार करून त्याच्यापर्यंत पोहचले पाहिजे.

आज कंत्राटी कामगार असुरक्षित आहेत, त्यामुळे आपले सरकार आल्यास कंत्राटी कामगारांना कायम करणार आहोत याची त्यांना हमी द्या, दुसरा शेतकरी वर्ग असुरक्षित आहे, हे सरकार त्यांची लूट करीत आहे.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : जाती-धर्माच्या नावाने डोके फिरू देऊ नका : ॲड. प्रकाश आंबेडकर

शेतीमालाची कृत्रिम पद्धतीने टंचाई निर्माण करून त्याचे भाव वाढवून जनतेची लूट करतात, भाव पाडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

हे लुटारू सरकार मातीत मिळवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, जो कोणी विरोधी जाईल त्याच्यावर इडी कारवाईचा बडगा ते उगारतात, त्यामुळे त्या भीतीने माणूस नमते घेतो, मग ते त्याला विरोधी गटात जाऊ नको संदेश देतात. मोदी भक्तांना मोदींनी काय महत्वाचे काम केले ते विचारा, ते सांगू शकणार नाहीत.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar: नागपूरला अधिवेशन नव्हे, तमाशा सुरू : ॲड. प्रकाश आंबेडकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.