Inspirational News : अवघ्या 20 दिवसांच्या चिमुकलीला बाहेर सोडून प्रणालीने दिली परीक्षा!

pranali nikam
pranali nikamesakal
Updated on

Jalgaon News : राज्यभर सोमवारी (ता. २४) बीएड सीईटीचा पेपर होता. तो देण्यासाठी चोपडा येथील प्रणाली निकम हिने तिच्या वीस दिवसांच्या आईजवळ सोडून बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेपर दिला. (pranali nikam give NEET exam leaving out her 20 day old baby jalgaon news)

अडावद येथील प्रणाली निकम पुणे येथे राहते. बी एडच्या सीइटी साठी ती चोपडा येथे आली होती. विद्यापीठात त्याच्या आजीजवळ सोडून झाडाखाली सोडून तिने सीइटीचा पेपर दिला. मात्र पेपर देऊन परत येईपर्यंत तिच्या जीवाची घालमेल झाली होती. प्रणाली मोरे हिचे गेल्या वर्षी १५ मे ला लग्न झाले.

यांचे पती महेश निकम हे पुण्यात बँकेत नोकरीला असून, प्रणालीला वीस दिवसाची मुलगी आहे. ती वडिलांकडे चोपडा येथे आली होती तिचा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात बीएड सीईटीचा पेपर होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

pranali nikam
Jalgaon Water Shortage : 9 गावांना 10 टँकरने पाणीपुरवठा; गावांना तात्पुरती पाणीपुरवठा योजना

सकाळी प्रणाली निकम तिचा २० दिवसाचा बाळाला घेऊन आजी आजोबांसोबत विद्यापीठात पोहोचले सकाळी साडेआठपासून प्रणाली पेपर देण्यासाठी वर्गात गेली. इकडे लहान बाळ आजी सोबत झाडाखाली मांडीवर तर कधी झाडांच्या फांदीवर झोक्यावर तर कधी मांडीवर दूध पाजून तब्बल दोन तासानंतर सीईटीचा पेपर देऊन प्रणाली निकम बाहेर आली.

तिकडे पेपर देताना तिचे संपूर्ण लक्ष इकडे बाळाकडे होते तिच्या जिवाची घालमेल झाली होती अडावद येथील उपशिक्षक व 'सकाळ'चे बातमीदार रोहिदास मोरे यांची प्रणाली मुलगी आहे. तिचे अडावद व चोपडा परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

pranali nikam
Jalgaon Unseasonal Rain : जामनेर तालुक्यात वादळी तडाखा; ज्वारी, मका, बाजरीसह पिकांचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()