Jalgaon News : दिराने केला वहिनीसह दोघा मुलांचा स्वीकार! मराठा समाजातील आदर्श विवाह..

Prashant Patil who is married to his sister-in-law
Prashant Patil who is married to his sister-in-law esakal
Updated on

Jalgaon News : येथील कृष्णापुरी भागातील शिवकॉलनीतील प्रशांत पाटील या युवकाने आपल्या मोठ्या भावाच्या विधवा पत्नीसह दोघा मुलांचा स्वीकार करत आपल्या औदार्याचे व कुटुंबवत्सल वृत्तीचे दर्शन घडवले.

प्रशांतच्या या आदर्शत्वाचे कौतुक होत आहे. (Prashant Patil married to his widow sister in law jalgaon news)

कृष्णापुरी भागातील शिव कॉलनीतील वीज वितरणचे निवृत्त कर्मचारी शिवाजी पाटील यांचा मोठा मुलगा विकास याचे गेल्या वर्षी ब्रेन हॅमरेजने निधन झाले होते. त्यास दोन मुले असून, विधवा सुनेसह मुलांची जबाबदारी शिवाजी पाटील यांच्यावर येऊन ठेपली.

विधवा सुनेला व नातवंडांना शेवटपर्यंत आधार द्यावा, या विचारातून शिवाजी पाटील यांनी आपला लहान मुलगा प्रशांत यास विश्वासात घेऊन प्रस्ताव मांडला. विधवा सुनेशी विवाह करून निरागस बालकांचेही पितृत्व प्रशांतने स्वीकारावे, असा विचार व्यक्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Prashant Patil who is married to his sister-in-law
Jalgaon Sharad Pawar : शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेरात

या परिसरातील नगरसेवक विकास पाटील यांनीही या कामी पुढाकार घेतला. दोन्ही कुटुंबातील प्रमुखांशी बोलणी करून व योग्य ते नियोजन केले. धोनी कुटुंबीयांसह प्रशांतने यासाठी मंजुरी दिल्याने महादेवाचे बांबरुड (ता. पाचोरा) येथील महादेव मंदिरात दोन्ही कुटुंबीयांच्या आपेष्टांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

प्रशांत पाटील यांनी वहिनीशी विवाह करून भावाच्या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारून मराठा समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याने त्याचे कौतुक होत आहे.

Prashant Patil who is married to his sister-in-law
Deccan Queen Railway : ‘दख्खनची राणी’ झाली 93 वर्षांची..! मध्य रेल्वेची डीलक्स ट्रेन डायनिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.