Amalner Marathi Sahitya Sammelan : येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने सोमवार (ता.२९) पासून सुरवात झाली.
तिने ‘माझी माय सरस्वती’ अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या बहारदार नृत्याने सर्वांची मने जिंकली. नंतर सुनील वाघ व सहकारी यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा बहारदार संगीत गायन कार्यक्रम सादर केला. (Pre Marathi Sahitya Samelan cultural programs begin amalner jalgaon news)
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, पूज्य साने गुरुजी व प्रताप शेठजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जयश्री पाटील, साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा.नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन उपस्थित होते.
स्मिता वाघ म्हणाल्या की, या कार्यक्रमाचे उद्घघाटन आमच्या हातून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. डॉ.अमोघ जोशी यांनी आजच्या दिवसाची सर्व जबाबदारी सांभाळली.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला
आर्या शेंदूर्णीकर (कथ्थक) बहारदार संगीत व गीत गायन सुनील बळवंत वाघ, अनिल दत्तात्रय वैद्य,उज्वल शंकर पाटील,शिवानी सुनील वाघ, सूरश्री अनिल वैद्य, विजय गोविंद शुक्ल,मंगेश प्रभाकर गुरव, रूपक अनिल वैद्य, गिरीश दत्तात्रेय चौक, नितीन उत्तमराव गुरव, राऊफ शेख यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.