Sakal Special News : सावली ऑक्सिजन देणाऱ्या वड कडुनिंब पिंपळाला जपा; आयुर्वेदचार्यांचा सल्ला

Neem Pipal Tree News
Neem Pipal Tree Newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्याचा तापमानाचा पारा यंदा ४७ अंशापर्यंत गेला. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मे महिना कडक तापमानाचा होता.

यामुळे यंदा पावसाळ्यात भरपूर सावली, ऑक्सिजन देणारे व मानवी आरोग्याला लाभकारक वड, पिंपळ, कडुनिंबाची झाडे लावा व त्यांना जपा, असा सल्ला आयुर्वेदार्यांनी जळगावकरांना दिला आहे.

भारतीय संस्कृतीत वड, पिंपळ, कडुनिंबाला धार्मिक व आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे. तिन्ही वृक्षांची साल, पाने मानवी आरोग्यासाठी फायद्याची असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. (Preserve shade oxygen giving Kadunimb Pimpalala Advice of Ayurvedacharya to maintain good health Jalgaon News )

कडुनिंबाचे झाड व पाने फायदेशीर

*शरीरावर खाज येत असल्यास कडुनिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो. कडुनिंबाची ताजी पाने बारीक करून खाज असलेल्या भागावर लावल्यास खाजेपासून सुटका मिळते. कडुनिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावल्यास त्याचे ॲन्टिफंगल गुणधर्म लगेचच प्रभाव दाखवितात.

*केसात कोंडा झाल्यास पातेल्यात पाणी घालून त्यात कडूनिंबाची पाने टाका. पाणी थंड झाल्यावर शॅम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवून घेतल्यास केस स्वच्छ होतात. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर कडुनिंब मदत करते. कडुनिंबाची पावडर रोज टाळूवर लावल्याने केस अकाली पांढरे होणे बंद होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Neem Pipal Tree News
Crime News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या का झाली? पोलिसांनी लावला छडा

*कडुनिंबाची पाने बारीक करून त्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचेलाही चमक येते. कडुनिंबाचा फेस मास्क सुरकुत्या, वृद्धत्व कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

*कडुनिंबाची पाने बारीक करून कीटक चावलेल्या ठिकाणी लावल्यास कीटकांद्वारे पसरणारे संक्रमण टाळता येते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कडुनिंबाची पाने बारीक करून भाजीच्या रसासोबत पिऊ शकतात.

*प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कडुनिंबाची दोन-तीन पाने खाणे चांगले मानले जाते. ही पाने चवीला खूप कडू असतात. त्यामुळे ती पाण्यासोबत मिळू शकतात. हिरड्या किंवा दातांमध्ये दुखत असल्यास कडुनिंबाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तोंडाचा वास दूर होऊ शकतो.

Neem Pipal Tree News
Nashik News : मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर-ताल-नृत्य

बहुगुणी पिंपळ

पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे होतात. उदरशूल व पोटाच्या अन्य विकारांवर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालीचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळच्या सालीपासून लाल रंग तयार होतो.

पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. अश्वत्थमारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावणातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे.

Neem Pipal Tree News
kishor Aware news: आमदार sunil shelake यांच्या संकटमुक्तीसाठी समर्थकांच थेट देवाला साकडं | Maval | NCP

आयुर्वेदात महत्त्व असलेला वड

वडाच्या पानापासून जेवणासाठी पत्रावळी तयार करतात. वडाची पाने, फुले व सालाचा औषध म्हणून उपयोग होतो. त्याचा चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदनासाठी तांबविण्यासाठी वापरतात.

वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात. वटवृक्ष भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा सण याच झाडाशी संबंधित आहे.

सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणल्याची कथा आहे. आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी वटपौर्णिमेला वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. चार वेदांपेकी ऋग्वेद व अतर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो. ‘वड’ हे ब्रह्मदेवांचे निवासस्थान आहे, अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. भगवान शिवांचेही या वृक्षला निवासस्थान मानतात.

Neem Pipal Tree News
Girish Mahajan News : खडसेंच्या स्वार्थामुळे त्यांचा जावाई तुरुंगात : गिरीश महाजन

"वड, पिंपळ, कडुनिंब बहुगुणी आहेत. मानवी शरीरासाठी त्यांचे खूप फायदे आहेत. भरपूर ऑक्सिजन व सावली देण्याबरोबरच या झाडांची पाने, सालीचा उपयोग केसांची वाढ, दातांचे दुखणे, रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी करता येतो. त्याचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."

प्रा. डॉ. रेवती गर्गे, शासकीय आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

Neem Pipal Tree News
Crime News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या का झाली? पोलिसांनी लावला छडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()