Jalgaon News : सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर.. ‘खाकी’ तील गुन्हेगारी भयानक!

Crime news
Crime newsesakal
Updated on

Jalgaon News : जळगावातील स्टेट बँक शाखेत सशस्त्र दरोड्याच्या शहारे आणणाऱ्या घटनेत पोलिस उपनिरीक्षकाच्या सहभागाने पोलिस दलातील गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात तर दरोड्याच्याच नव्हे, तर खंडणी, अवैध वाळू वाहतुकीसारख्या घटनांमध्ये पोलिसांच्या उघड अन्‌ छुप्या सहभागाची खेदजनक परंपराच असल्याचे इतिहास सांगतो.

अर्थात्‌, या दरोड्याच्या घटनेने पोलिस दलासमोर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न जसा निर्माण केलाय, तसे पोलिस दलातील गुन्हेगारीचे आव्हानही उभे केलेय. दुर्दैवाने त्यातून पोलिस दल धडा घेताना दिसत नाही, हे आणखी एक विदारक वास्तव. (Problem of law and order serious Crime in Khaki terrible Jalgaon News)

खरेतर कुणाची सहज नजर जाणार नाही, कुणी दखल घेणार नाही अशा जळगाव शहरातील दुर्लक्षित कालिंका माता मंदिर चौकाजवळ स्टेट बँकेची दरोडा पडलेली शाखा. ज्या इमारतीत ही शाखा आहे, ती इमारतही अडचणीची.

परंतु, एखाद्या मुरलेल्या दरोडेखोरांनाही लाजवेल, अशी दरोड्याची घटना गुरुवारी सकाळी बँक उघडण्याच्या बेतात असताना घडली. १७ लाखांची रोकड आणि तीन कोटींचे सोने हा काही थोडा- थोडका ऐवज नाही. त्यातही बँक व्यवस्थापकावर चॉपरने वार करत, कॅश क्लार्कला कोयत्याचा धाक दाखवत कथित दरोडेखोरांनी या घटनेला ‘अंजाम’ दिला.

मुळात घटनेनंतर पोलिसांच्या हाती कोणत्याही प्रकारचा ठोस सुगावा लागला नव्हता. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळविल्याने तपासात व्यत्यय येणे स्वाभाविक होते. परंतु, जिल्हा पोलिस दलाने ज्या तातडीने तपासचक्रे फिरवली, तपासाला गती दिली, त्यातून गुन्हा घडण्याच्या अवघ्या ३६ तासांत तो उघडकीस आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime news
Jalgaon News : वादळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू

विशेष म्हणजे, दरोड्यातील सोने, रोकडही हस्तगत करण्यात आली. त्यामुळे घटना घडल्यानंतर कायदा- सुव्यवस्थेबद्दल जो प्रश्‍न उपस्थित झाला होता, त्याला पोलिसांनी गुन्ह्याचा लगेच छडा लावून कृतीतून उत्तर दिले, हे बरे झाले. मात्र, त्यानंतरही अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून ते अर्थातच, घटनेपेक्षाही अधिक गंभीर आहेत.

दरोड्याची ही घटना जेवढी गंभीर होती, त्यापेक्षाही ती उघड होण्यातून जी तथ्ये बाहेर आली ती अत्यंत भयावह आणि धक्कादायक आहे. घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस दलाने अवघ्या काही तासांत तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

पैकी त्यातील मास्टरमाईंड शंकर रमेश जासक हा मुंबईत पोलिस दलात दीर्घ रजेवर असलेला उपनिरीक्षक आहे. त्याचे वडील रमेश व मेव्हणा मनोज रमेश सूर्यवंशी यांच्या मदतीने शंकर जासकने बँकेवरील दरोड्याचा ‘प्लॅन’ केला आणि तो यशस्वीपणे अंमलातही आणला. बँकेवर इतक्या सफाईने दरोडा टाकून सोने, रोकड लंपास करण्यामागे कुणी बँकेतील कर्मचारी सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते.

Crime news
Jalgaon News : झाडाची फांदी पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

तो संशय मनोज सूर्यवंशी या कंत्राटी सफाई कामगाराचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर खरा ठरला. मात्र, या घटनेत एखादा निलंबित पीएसआय सहभागी असावा, याची कुणी कल्पनाही केली नसेल.

आणि हीच बाब पोलिस दलासाठी अत्यंत गंभीर आहे. जळगावात गुन्हेगारी कारवायांमध्ये पोलिसांचा सहभाग ही नवीन बाब नसली, तरी अशा प्रकारच्या दरोड्यात पोलिस अधिकाऱ्याच्या सहभागाने ‘खाकी’ला आत्मचिंतन करणे अनिवार्य झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात वाळू व्यवसायातील सहभाग, अगदी बांधकाम व्यवसायातही पोलिसांची भागिदारी असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. एखाद्या व्यवसायातील भागिदारीपुरते हे संबंध नाहीत, तर अवैध वाळू वाहतुकीतील गुन्हेगारीपर्यंत ते प्रस्थापित झाले आहेत.

आता तर शंकर जासक या उपनिरीक्षकाच्या थेट दरोड्यातील सहभागाने पोलिस दलातील गुन्हेगारी चिंतेचा विषय बनल्याचे दिसून येतेय. ‘खाकी’तील या कलंकित वृत्तींना वेळीच आवर घातला नाही, तर रक्षकच भक्षक बनतील आणि अराजक माजेल, हे वेगळे सांगायला नको.

Crime news
Nashik Accident News : कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी; शेकडो कोंबड्या मृत्युमुखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.