अमळनेर : तालुक्यातील पाडळसे धरण गतीने पूर्ण व्हावे, यासाठी जनआंदोलन समितीच्या ५१ हजार पत्र लेखन आंदोलनात ठिकठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जानवे येथे हळदीच्या समारंभात वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे धरणासाठी पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
तर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनीही मासिक सभेत पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. (Program of Haldi kunku Letter to Government fifty one thousand letters will go to government for dam Jalgaon News)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
जानवे येथील माजी सरपंच भटू पाटील यांचे सुपुत्र शुभम पाटील व श्रीराम देवरे यांची कन्या गायत्री यांच्या हळदीच्याप्रसंगी उपस्थित वऱ्हाडी मंडळीने वेळ काढून पाडळसे धरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे पत्र लिहून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले.
शिवधर्म पद्धतीने पार पडलेल्या या हळदीच्या लग्न सोहळ्यात आर. बी. पाटील, वसुंधरा लांडगे यांनी विधिवत कार्य पार पाडताना सामाजिक योगदान देण्याचा आदर्श वधू-वर यांनी त्यांच्या नातेवाईक मंडळींसह निर्माण केला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते प्रा. शिवाजीराव पाटील, विश्वास पाटील, माजी सभापती श्याम अहिरे, माजी सरपंच रावसाहेब पाटील, रुपाली पाटील, दिनेश पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.