जळगाव : शहरातील महापालिकेचे पाच व्यापारी संकुल व दाणाबाजार, सुभाष चौक या बाजारपट्टयात रात्री साफसफाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ३५ कर्मचाऱ्यांची मागणी असून, हे काम मक्तेदाराकडून करून घेण्यात येणार आहे. (proposal has prepared by health department cleanliness drive at night on municipal corporation area jalgaon news)
शहरातील महापालिकेचे फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, महात्मा गांधी मार्के, बी. जे. मार्केट, न्यू बी. जे. मार्केट, तर सुभाष चौक, दाणाबाजार, बळीराम पेठ भाजी मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचतो.
या भागात सकाळी साफसफाई केल्यास व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडल्यावर पुन्हा ते बाहेर कचरा टाकतात. त्यामुळे त्या ठिकाणी कचरा साचतो. या ठिकाणी रात्री साफसफाईचे काम करण्यात येईल व रात्रीच मक्तेदाराकडून कचरा उचलून टाकण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
त्यासाठी आरोग्य विभागाने ३५ कामगारांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. महापालिकेच्या आस्थापना सूचीवरील कामगारांकडून हे काम केल्यास कर्मचारी संख्या कमी असल्याने वॉर्डातील कामांना खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्तेदाराकडून कर्मचारी घेऊन हे काम करण्याचा प्रस्ताव आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
यामुळे या परिसरात साफसफाई होत नसल्याची तक्रार कायमस्वरूपी दूर होणार आहे. यात विशेष म्हणजे साफसफाईचा कोणताही नवीन मक्ता न काढता महापालिकेचे सफाई मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीकडून हे कर्मचारी घेण्याचे सूचविले आहे.
यासाठी वर्षभरात ८२ लाख ५३ हजार खर्च अपेक्षित आहे. आता केवळ आयुक्तंची मंजुरी बाकी आहे. आयुक्तपदाचा निर्णय होताच व या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्यास शहरातील या संकुलांची व दाणाबाजारातील साफसफाईची समस्या कायमची सुटणार आहे.
"शहरातील महापालिकेचे पाच संकुल व बाजारपट्ट्यातील साफसफाईबाबत नेहमीच तक्रार असते. त्यामळे हा रात्रीच्या साफसफाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तत्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात येईल." -उदय पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.