Jalgaon News : 500 चौरस फुटाच्या घरांना घरपट्टी माफ; महासभेत प्रस्ताव

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील ५०० चौरसफुटाच्या घरांना घरपट्टी माफ करण्याबाबत महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. येत्या बुधवारी (ता. २३) त्यावर सभेत चर्चा होणार आहे. (proposal was made in Municipal Corporation to waive rent for 500 square feet house jalgaon news)

जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १७ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. या पार्श्‍वभुमीवर सतरा मजली इमारातीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकराला ही सभा होईल. महापौर जयश्री महाजन पिठासीन अध्यक्ष असतील.

सभेत एकूण ५१ विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. घरपट्टी माफ करण्याबाबतचा प्रस्ताव महापौर महाजन यांनी अशासकीय प्रस्तावात दिला आहे. बृहन्मुंबईच्या धर्तीवर हा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच, पिंप्राळा घरकुल भागात दहा एकर क्षेत्रफळ जागेत भव्य दिक्षाभूमी विकसित करण्यासाठी वास्तुविशारद नियुक्ती करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Municipal Corporation
Fake Document Case : पोलिस पाटील भरतीत बनावट कागदपत्रांचा वापर; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

कविवर्य महानोरांचे स्मारक

दिवंगत कवी ना. धों. महानोर यांचे स्मारक जळगाव शहरात उभारण्याचा प्रस्तावही महापौर महाजन यांनी दिला आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ती बंद पडली.

आता पुन्हा शहर बससेवा सुरू करून ती कानळदा, असोदा, नशिराबाद, शिरसोली गावापर्यंत नेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याशिवाय शहर विकासाचे प्रस्तावही देण्यात आले आहेत.

बेंडाळे यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार

महापालिकेतर्फे खानदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देण्याचा प्रस्ताव महापौर महाजन यांनी दिला आहे. शिक्षण क्षेत्रात केलेल्या अमूल्य कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : संगमेश्वरचे विद्यार्थी गिरवताहेत डिजिटल धडे; शिक्षक हिरेंच्या प्रयत्नातून घडला बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.