NCP Akrosh Morcha : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे 30 नोव्हेंबरला जळगावमध्ये आक्रोश मोर्चा

Jayant Patil Sharad Pawar
Jayant Patil Sharad Pawaresakal
Updated on

NCP Akrosh Morcha : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे ३० नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्‍नासाठी जळगावमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंगळवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिली. (Protest march in Jalgaon on November 30 by Sharad Pawar faction of NCP news)

जळगाव येथे मुक्ताई निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते. खडसे म्हणाले, की जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत.

त्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे, जिल्ह्यातील केळी उत्पादकांना अद्याप पीक विमा मिळाला नाही, तो ताबडतोब देण्यात यावा. कापसाला भाव नसल्यामुळे अद्याप शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे.

शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रूपये भाव देण्यात यावा. पणन महासंघातर्फे कापूस खरेदी सुरू करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यास राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल.

Jayant Patil Sharad Pawar
NCP Sharad Pawar: शरद पवार गटाने कंबर कसली; लोकसभेच्या 'इतक्या' जागांवर ‘राष्ट्रवादी’ची नजर

जळगावमधील औद्योगिक वसाहतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून दुपारी एकला मोर्चाला सुरवात होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

मोर्चात बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि शेतकरी, नागरिक मोठ्याप्रमाणात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावी, असेही खडसे यांनी सांगितले.

Jayant Patil Sharad Pawar
NCP Political Crisis: 'अजित पवारांच्या अध्यक्षपदी निवडीबाबत शरद पवार गटाचे प्रश्नचिन्ह', निवडणूक आयोगासमोर उपस्थित केले प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.