PSI Success Story : दूध विक्रेत्याचा मुलगा झाला पीएसआय! परिसरात मिरवणूक, भव्य सत्कार

Sharad Mali felicitating Sub Inspector of Police Deepak Mali
Sharad Mali felicitating Sub Inspector of Police Deepak Mali esakal
Updated on

PSI Success Story : येथील कांचननगरातील रहिवासी व घरोघरी जाऊन दूध विक्रीचा व्यवसाय करणारे रामचंद्र बाबूराव माळी व सुनंदा रामचंद्र माळी यांचा मुलगा दीपक रामचंद्र माळी यांनी २०२० मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली होती.

त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले असून, पोलिस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली आहे. (psi success story Deepak Mali was elected as Sub Inspector of Police jalgaon news)

दीपक माळी यांनी कोणतेही क्लास लावले नव्हते. घरीच अभ्यास करून यश मिळविले. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण शेठ ला. ना विद्यालयात झाले. नंतर ‘एसएमआयटी’मध्ये सायन्स डिप्लोमा, तर पुणे येथील ऑल इंडिया शिवाजी मेमोरियममध्ये इंजिनिअरिंग झाले.

दीपक माळी यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल साईबाबा मंदिर संस्थान, श्री गुरूदत्त बहुउद्देशीय संस्था कांचननगर व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी वाल्मिकनगरातील हनुमान मंदिर ते कांचननगरातील दीपक माळी यांच्या घरापर्यंत नाचत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad Mali felicitating Sub Inspector of Police Deepak Mali
PSI Success Story : गरीबीवर मात करून कुटुंबाचा गाडा हाकता हाकता पतीच्या पाठिंब्यातून अनिता बनली पोलिस उपनिरीक्षक

त्या वेळेस काही महिलांनी दीपक यांचे औक्षण केले. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. दीपक यांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

दीपक माळी यांचा सत्कार नगरसेविका कांचन सोनवणे, गुरुदत्त बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र कोळी, साईबाबा मंदिर संस्थानमार्फत पवन सैंदाणे, माजी नगरसेवक विजय वाडकर, शरद माळी, अंजू माळी, अशोक माळी, उषा माळी, अरुण माळी, संदीप माळी, पप्पू माळी, दीपकचे मित्र-परिवार व परिसरातील नागरिकांनी केला.

Sharad Mali felicitating Sub Inspector of Police Deepak Mali
PSI Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.