Crime Update : बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची खरेदी विक्री; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime Update
Crime Updateesakal
Updated on

जळगाव : बनावट कागदपत्रांद्वारे पिंप्राळा शिवारात एक हेक्टर ६९ आर भूखंडाची खरेदी व विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध अशोक राणे (वय ६३, रा. भोईटे नगर) यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक (३३८/१ क्षेत्र ६६ आर व गट क्रमांक ३३९ अ क्षेत्र ९५ आर) एकूण १ हेक्टर ६९ आर भूखंडाची विक्री झाली आहे. या जमिनीची किंमत ५ ते ६ कोटी रुपये असून १३ मार्च ते १९ जुलै २०१३ या कालावधीत बनावट कागदपत्र तयार करून सह धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयात सादर केले. (Purchase and sale of land through forged documents case has been registered against 7 persons Jalgaon Crime News)

Crime Update
Jalgaon : खासगी संकुलाच्या तळमजल्याची अतिक्रमण कारवाई थांबविण्याचा ‘खेळ’

हा भूखंड विक्री करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या हिताचे आदेश पारित करून धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्याने अजगर अजिज पटेल (रा. भादली बुद्रुक, ता. जळगाव), गुरुमुख मेरुमल जगवाणी, हरीष ए. मतवाणी, नीलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळुंके, मीना विठ्ठल सोळुंके व एच.ए.लोकचंदाणी ( सर्व.रा.जळगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुरक्षा हटविली

माजी विधानपरिषद सदस्य गुरुमुख जगवाणी २००४ ते २०१० आणि २०१४ ते २०१६ या कालावधीत विधान परिषदेचे आमदार होते. वर्ष-२०१६ नंतर सुद्धा त्यांना पोलिस दलातर्फे अंगरक्षक सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, माहिती अधिकारात ६ ऑक्टोबर रोजी जगवाणी यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेची माहिती मागितली होती. १४ ऑक्टोबर रोजी शासन आदेशानुसार जगवाणी यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींना पुरवण्यात आलेल्या अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर दै.सकाळने दोन महिन्यापूर्वीच मालिका प्रसिद्ध करून पोलिस मुख्यालयातील कारभारावर लक्ष वेधले होते.

Crime Update
Gulabrao Patil : एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता,तर राष्ट्रवादीच भाजपसोबत सत्तेत दिसली असती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.