Uddhav Thackeray : शेंडी-जानव्याचा उल्लेख आता खपवून घेणार नाही; पुरोहित मंडळाचा इशारा

Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Jalgaon News : प्रत्येक सभेत जानवे, शेंडीचा उल्लेख करून उद्धव ठाकरे केवळ ब्राह्मणच नव्हे, तर अन्यधर्मीय व क्षत्रियांचाही अपमान करीत आहेत. यापुढे ठाकरे यांच्या भाषणातून असा अपमान सहन करणार नाही, असा इशारा जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाने दिला आहे. (Purohit Mandal warning on Uddhav Thackeray speech jalgaon news)

उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रत्येक सभेत ‘शेंडी- जानव्याचे हिंदुत्व’, असा उल्लेख करतात. मुळात हिंदुत्व अथवा इतर कुठल्याही मुद्यावर भाषण करताना एखाद्या धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या बाबींचा उल्लेख करण्याची गरज काय? ब्राह्मण समाजातच नव्हे, तर इतरही अनेक समाजात जानवे धारण केले जाते, शेंडी ठेवली जाते. हिंदू धर्मात या दोन्ही बाबी पवित्र मानल्या जातात. त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

असे असताना ठाकरे समस्त ब्राह्मण व हिंदू धर्माचाही अवमान करीत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही सभेत त्यांनी शेंडी- जानव्याचा उल्लेख करू नये, अन्यथा ब्राह्मण समाज आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा पुरोहित मंडळाने दिला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Uddhav Thackeray
Political News : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची भेट घेतली व आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुरोहित मंडळाचे अध्यक्ष भूषण मुळे, राजाभाऊ जोशी, नंदू शुक्ल, अजय जोशी, गजानन जोशी, वैभव शूर, अविकुमार जोशी, प्रदीप जोशी, गिरीश जोशी, प्रसाद पिंपळे, दिनेश जोशी, मुकुंद धर्माधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Jalgaon Political News : शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्षांचा राजीनामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.