Jalgaon News : ‘अमृत’चे काम अपूर्ण असताना केले रस्ते; सार्वजनिक बांधकाम विभागाची अतिघाई

PWD News
PWD Newsesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहेत. या विभागाने अतिघाई करून ‘अमृत’चे काम अपूर्ण असताना काही भागात रस्ते तयार केले आहेत. मात्र, आता हे रस्ते पुन्हा खोदावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी दिले आहेत. त्यातून रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहेत. (pwd has hastily constructed roads in some areas while Amrit work is incomplete jalgaon news)

महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय करून कामे करावीत, असे सांगितले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने इंद्रनिल हौसिंग सोसायटी, अयोध्यानगर, पिंप्राळा हुडको, खोटेनगर भागातील रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.

त्या ठिकाणी नळकनेक्शन व भूमिगत गटारींची कामे बाकी आहेत. त्या ठिकाणी जागा सोडणे आवश्यक असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी जागा न सोडता सरसकट संपूर्ण रुंदीचे रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले नळकनेक्शन, पाइपलाईन व भूमिगत गटारींसाठी ते रस्ते पुन्हा खोदावे लागणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

PWD News
Jalgaon News : बायोडिझेलने भरलेला कंटेनर ताब्यात; कारवाईसाठी पुरवठा अधिकांना पत्र

महापालिकेने ‘ना हरकत’ देताना दिलेल्या अटींचा सार्वजनिक बांधकाम विभागाने भंग केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिघाईमुळे निधीचेही मोठे नुकसान होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महापौर घेणार अधिकाऱ्यांची बैठक

महापौर जयश्री महाजन यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. मात्र, अधिकारी मुंबईला बैठकीस गेल्याने आता ही बैठक सोमवारी (ता. १७) होणार आहे. तीत शहरातील रस्त्यांच्या कामांची संपूर्ण माहिती घेण्यात येईल, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

PWD News
Jalgaon Traffic Problem : पाचोरा शहरात वाहनतळाअभावी कोंडी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘खो'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.