Jalgaon News : शहरात शासनाच्या शंभर व बांधकाम विभागाच्या ८५ कोटींच्या निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामे दर्जेदार करावीत, यासाठी ‘क्वॉलिटी कंट्रोलर’ नियुक्त करावा. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी यांनी समन्वय ठेवावा, असे मत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केले. शहरातील रस्तेकामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २०) बैठक झाली, त्या वेळी त्यांनी ही सूचना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी बैठक घेण्यात आली. आमदार सुरेश भोळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महावितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. (Quality controller for city road work jalgaon news)
जळगाव शहरात राज्य शासनामार्फत नगरविकास विभागाच्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून कॉलनी भागातील रस्ते व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून ८५ कोटी रुपयांचे शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू झालेली आहे. ही कामे करीत असताना संबंधित विभागात समन्वय दिसून येत नाही, त्यामुळे अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतात, असे मत आमदार भोळे यांनी व्यक्त केले.
त्याकरिता कामे करताना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे मत व्यक्त केले. याबाबत उपाययोजना करण्याबाबत त्यांनी आदेश दिले. त्यांनी सांगितले, की ज्या ठिकाणी रस्त्यामध्ये वीजखांब किंवा रोहित्र आलेल्या आहेत त्या त्वरित महावितरणाने बाजूला कराव्यात. जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही.
जेथे रस्त्यांची कामे सुरू होत आहे, अशा ठिकाणी अमृत योजनेचे संयोजन पूर्ण झालेले असावे, तसेच ज्या नागरिकांचे संयोजन जोडलेले नाही, त्यांच्याकडून लवकरात लवकर संयोजन घ्यावे व रस्ता झाल्यानंतर संयोजनासाठी रस्त्या तोडण्याची वेळ आली तर संबंधितांकडून त्याची भरपाई घ्यावी. भुयारी गटारी योजनेचे संयोजन हे नागरिकांमध्ये जागरूकता करून रस्ते होण्याआधी करून घ्यावे, जेणेकरून नंतर रस्ता खराब होणार नाही.
भुयारी गटारीचे चेंबर हे रस्त्याखाली दाबले जाणार नाही, यासाठी नियोजन करावे. रस्त्यांची कामे ही दर्जेदार पद्धतीने व्हावी, यासाठी क्वॉलिटी कंट्रोल यांची नियुक्ती करावी. तसेच या वेळी पंतप्रधान गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांच्या जमिनीसाठी, अतिक्रमण नियमितीकरणासाठीसुद्धा चर्चा करण्यात आली.
"मी जरी आमदार असलो व विभाग जरी वेगवेगळे असले तरी आपली बांधिलकी ही नागरिकांसोबत आहे. रस्त्यांची कामे ही पुनःपुन्हा न होणारी व नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक मूलभूत सुविधा आहे म्हणून राज्य शासनातर्फे जो निधी आपल्याला मिळालेला आहे त्यासाठी सर्व विभाग व अधिकारी यांनी एकत्र येऊन समन्वयाने ही कामे करायला हवी." - सुरेश भोळे, आमदार, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.