Jalgaon Agriculture News : विषम वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही काहीअंशी वाढ झाली आहे.
Rabi crops hit due to adverse weather conditions Jalgaon Agriculture News
Rabi crops hit due to adverse weather conditions Jalgaon Agriculture Newsesakal
Updated on

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही काहीअंशी वाढ झाली आहे. विषम वातावरणाचा रब्बी, वेलवर्गीय व फळ पिकांनाही फटका बसत आहे. यंदा हुडहुडी भरविणारी थंडी मागील आठवड्यात काही दिवस होती.

एक फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरणाची समस्या वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ३२ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. परंतु ढगाळ वातावरणाने किमान तापमानात वाढ झाली आहे. (Rabi crops hit due to adverse weather conditions Jalgaon Agriculture News)

यंदा नोव्हेंबरमध्ये तीन दिवस किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत होते. डिसेंबरमध्येही सुमारे २६ दिवस ढगाळ व पावसाळी वातावरण होते. यामुळे रब्बी पिकांच्या वाढीला फटका बसला आहे.

दादर ज्वारी, संकरित ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. विषम वातावरणामुळे वेलवर्गीय पिकांसह मका, केळी पिकात फवारणी घेऊन बुरशीजन्य व अन्य कीटकांची समस्या दूर करावी लागत आहे.

यात खर्च व अतिरिक्त श्रम लागत आहेत. तसेच उत्पादनावरही परिणाम होत आहे. थंडीमुळे केळी पिकात करपा रोगाची समस्या आली होती. मध्येच ढगाळ वातावरण तयार झाल्याने बुरशीजन्य रोगही केळीत फोफावू लागले आहेत. यामुळे खते, पाण्यासंबंधीचे काटेकोर नियोजन शेतकऱ्यांना करावे लागत आहे. मध्येच ढगाळ वातावरण तयार होत आहे.

हिवाळा जाणवलाच नाही

यंदा हिवाळा अधिक दिवस जाणवलाच नाही. हुडहुडी भरविणारी थंडी पडलीच नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. थंडी अधिक राहिल्यास ज्वारी, मका आदी पिकांचे सिंचन अधिकचे करावे लागत नाही.

Rabi crops hit due to adverse weather conditions Jalgaon Agriculture News
Jalgaon News : जळगावात राष्ट्रवादी अजित पवार,शरद पवार गट आमने सामने

किमान एक पाण्याची पाळी वाचते. परंतु यंदा थंडी नसल्याने पीकवाढीवर जसा परिणाम झाला. तशी पाण्याची गरजही वाढली आहे.

लाल गराच्या टरबुजासाठी ‘लाल पाण्या’चा आधार

गणपूर (ता चोपडा) : लाल गर असलेल्या टरबूजला चांगली मागणी असते. ते भुरसट किंवा सफेद निघाल्यास फेकावे लागते. मात्र याच लाल गराचे टरबूज पिकविताना लाल पाण्याच्या बाटलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

बहुदा शेतातील टरबुजाची शेती प्लास्टिकच्या मल्चिंग पेपर वापरून केली जाते. रोप उगवतांना मोकाट कुत्रे वेलच्या छिद्राचा भाग कोरण्याची किंवा प्लास्टिक कागदांना नखे लावून फाडण्याची भीती असते. कुत्रे लाल रंगाला भितात असा समज आहे.

त्यामुळे टरबूज लागवड केलेल्या शेतात रंगीत पाण्याची बाटली भरून ठेवल्यास कुत्रे येत नाहीत अशी भावना झाल्याचे दिसून येते. खानदेशात कुत्र्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी चार पाच वर्षापासून घराचा उंबरा आणि शेतात ठेवायच्या रंगीत बाटल्यांचा प्रयोग अजूनही सुरू असल्याचे त्यातून दिसून आले आहे. या प्रयोगाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिसून येतात.

Rabi crops hit due to adverse weather conditions Jalgaon Agriculture News
Jalgaon News : जळगावात राष्ट्रवादी अजित पवार,शरद पवार गट आमने सामने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.