Jalgaon News : येथील रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीन व चारवरील इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिजम कार्पेरेशन लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅटिंगबाहेर खाद्यपदार्थांची विक्री करण्याची परवानगी नसताना गुरुवारी (ता.२५) फलाटावर विक्री केल्याप्रकरणी आरपीएफ निरीक्षकांकडून कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कर्मचाऱ्याला रेल्वे आरपीएफ निरीक्षक आर. के. मीना यांनी शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ करीत बाहेर ओढले, तसेच मारहाण केली, असा आरोप सोपान रेस्टॉरंटच्या सुपरवायझरकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rada after taking action against Bhusawal seller Supervisor allegations RPF inspector beat employee Jalgaon News)
इटारसी येथील विष्णू पांडे यांनी रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीन व चारवर इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिजम कार्पेरेशन लिमिटेड, शाकाहारी भोजनालयाचा ठेका दोन वर्षांपासून घेऊन सोपान रेस्टॉरंटचे मालक नदीम नथ्थू बागवान यांना चालविण्यासाठी दिला आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता. २५) सकाळी अकराच्या दरम्यान झेलम एक्स्प्रेस भुसावळ फलाट क्रमांक चारवर आली असता सोपान रेस्टॉरंटमधील कर्मचारी शरीफ सत्तार तंबोली हा कर्मचारी इटली व मेदूवडा ट्रॉलीवरून, काँटिंगबाहेर विक्री करीत होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"समोरून रेल्वे आरपीएफ निरीक्षक आर. के.मीना यांना पाहताच ट्रॉली सोडून काँटिंगमध्ये जावून उभा राहिला. याबाबत दरम्यान, मीना यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठांना कळविला व त्यांच्या उपस्थितीत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिजम कार्पेरेशन लिमिटेड सोपान रेस्टॉरंट यास फलाटावर पदार्थ विक्री करण्याची परवानगी नाही. विक्री केल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार आहे."
- आर. के. मीना, रेल्वे आरपीएफ निरीक्षक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.