Jalgaon Crime News : नेरीनाका येथे जुगार अड्ड्यावर छापा; 1 लाख 67 हजारांच्या रोकड जप्त

crime
crime esakal
Updated on

Jalgaon Crime News : नेरीनाका परिसरात मोठा जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची गुप्त माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. ९) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक छापा टाकून १ लाख ६७ हजारांच्या रोकडसह तीन मोटारसायकली जप्त करुन २७ जुगारींना अटक केली आहे.(raid on gambling den at Nerinaka jalgaon crime news)

शहरात सट्टा-पत्ता जुगाराचे अड्डे चालवले जात असल्याच्या गुप्त माहितीवरुन जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह उपनिरीक्षक वाघमारे, सहाय्यक फौजदार राजेश मेढे आदींच्या पथकाने नेरीनाका परिसरात गज्याभाऊंचा जुगार अड्डा म्हणुन प्रसीद्ध असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकुन मिळेल त्याला ताब्यात घेण्यास सुरवात केली.

एकामागून एक अशा २७ जुगारींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १८ मोबाईल आणि घोळातील १ लाख ६७ हजार रूपये रोख रक्कम मिळून आली. रात्री उशिरापर्यंत अटकेसह कायदेशीर कारवाई सुरु होती.

अटकेतील जुगारी असे

सुनील पाटील (रा. पाचोरा), संदीप गोपाल (वावडदा), पंढरी कोळी (भादली), जगदीश हळवे (जुने जळगाव), स्वप्निल हवलदार (मेहरुण), गजानन चौधरी (तुकाराम वाडी), केशव भोळे (जुना खेडी रोड), नामदेव पाटील (मन्यारखेडा), नंदकिशोर चौधरी (तुकाराम वाडी), धनंजय कंडारे (शनिपेठ), नितीन गायकवाड (जुने जळगाव), गणेश पाटील (गुरुकुल कॉलनी), रवी बाविस्कर (वाल्मीकनगर), आकाश पाटील (जुना खेडी रोड), पिंटू भोई (टहाळकी, ता. धरणगाव), इब्राहिम सय्यद (मासूमवाडी), इम्रान सय्यद (मासूमवाडी), मनोज शिनकर (मारुती पेठ), चंद्रकांत शंकर पाटील (मन्यारखेडा), रमेश पुंडलिक सोनार (गिरणा टाकी परिसर), मुकेश पाटील (रामेश्‍वर कॉलनी), भरत बाविस्कर (लक्ष्मीनगर), अरुण चौधरी (सुप्रीम कॉलनी), मयूर कोल्हे (विठ्ठल पेठ), दत्तू सोनवणे (कांचननगर), नरेंद्र ठाकरे (मेस्को मातानगर), सीताराम सोनवणे (तुकाराम वाडी) या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

crime
Jalgaon Crime News : कजगाव परिसरात तिसऱ्या दिवशीही लूट; नागरिकांमध्ये दहशत

व्हायरल व्हिडीओची कमाल

जुगार अड्ड्यावरील शुटींग करुन ती, जिल्‍हा पेालिस अधीक्षकांना पाठवताच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मिडीयावर जुगार अड्ड्याचा खेळ व्हायरल होण्यापुर्वीच गुन्हेशाखेच्या पथकाने तडकाफडकी कारवाई केल्याने अवैध धंदेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.

एकच धावपळ अन्‌ फोना-फानी

मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याचे सांगत हा जुगार अड्डा चालवला जात होता. १ अधिकारी व पाच कर्मचारी अशा मोजक्याच पथकाने सुरवातीला छापा टाकला. पोलिसांना पाहुन जुगाऱ्यांनी धुम ठोकली. मुख्य बाजारपेठेचा परिसर असल्याने व जो-तो पळू लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला. जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोशल क्लबच्या नावाने जुगार चालवला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यासंदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही काहींनी संपर्क साधल्याचे सांगण्यात येते.

crime
Jalgaon Crime News : पिंप्री येथील सरपंच पतीस मारहाण; 24 जणांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.