Jalgaon : पानाची ‘लाली’ गुटख्याने उतरवली

tobacco
tobaccoesakal
Updated on

जळगाव : आकाशवाणी चौकातील ‘लालीपान’ सेंटर येथे बेकायदेशीररीत्या (illegal) सुगंधी तंबाखू (Tobacco), गुटखा पानमसाला विक्री होत असल्याच्या बातमीवरून अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) छापा टाकला. जप्त मालाच्या आधारावर दुकान मालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Raid on Lalipan Center Tobacco stocks seized Jalgaon News)

tobacco
Jalgaon : तरुणीच्या बनावट खात्याद्वारे इंस्टाग्रामवर चॅटींग करत बदनामी

शहरातील आकाशवाणी चौकातील लालीपान सेंटर येथे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला गुटख्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा देविदास महाजन यांच्यासह पथकाने सोमवारी संध्याकाळी नियोजनबद्धरीत्या छापा टाकला. पथकाला तपासणीत दुकानात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा पानमसाला असे आरोग्यास अपायकारक पदार्थ विक्री व साठवणूक केल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रीतसर घटनास्थळीच पंचनामा करून माल जप्त करून रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले.

tobacco
जळगाव : मागील भांडण उकरून एकाला बेदम मारहाण

प्राथमिक मोजणीत २२ हजार ९११ रुपयांच्या मालाची मोजदाद केल्यावर अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून लालीपान सेंटरचे संचालक दिनेश फुलचंद हसवाल (रा. देवेंद्रनगर) यांना ताब्यात घेतल्यावर चौकशीअंती त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.