Jalgaon News : शासनाकडून येत असलेल्या निधीत रस्त्याचे काम वळविण्यात येत आहेत. क्रॉंक्रीटीकरणाच्या कामात अगोदर मंजूर झालेले डांबरीकरणाचे काम अधर्वट सोडून देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
रेल्वे स्टेशन ते दूध फेडरेशन रस्त्याची अशीच अजब कहाणी आहे. आजच्या स्थितीत नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. (Railway station to Dudh Federation road dangerous jalgaon news)
शासनाने जळगावातील रस्ते कामासाठी ४२ कोटी रूपये मंजुर केले आहेत. त्यातून जळगाव शहरातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. याच निधीतून शिवाजीनगर भागातील रेल्वे स्टेशन ते दुध फेडरेशनपर्यंतचा रस्ता मंजूर करण्यात आला होता.
रस्त्याचे काम सुरू, पण...
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले, मक्तेदाराने या रस्त्याचे काम सुरू करून खडीकरण केले. मात्र, रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने केले. अनेक वेळा तक्रारी करूनही अनेक दिवस त्यांचे खडीकरणाचेच काम सुरू होते.
डांबराचा एक लेअर टाकून त्यावर खडीचा कच टाकण्यात आला. त्यानंतर कोटींगचे काम होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ते काम अर्धवट सोडून देण्यात आले.
खडी वर आल्याने त्रास
अर्धवट कामामुळे डांबरीकरणासाठी टाकण्यात आलेली खडी आता वाहतूकीमुळे वर आली आहे. त्यामुळे वाहन चालविणेही कठीण झाले आहे. दुचाकीधारकांना अक्षरश: जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. या रस्त्यावर अपघातात वाहनधारक पडल्यास त्याच्या डोक्याला दगड लागून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रस्ताच वळविला दुसऱ्या निधीत
अर्धवट काम झालेला हा रस्ता दुसऱ्याच निधीत वळविल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. शासनाच्या ४२ कोटी रूपयांतून अपेक्षित हा रस्ता आता शंभर कोटीच्या निधीत वळविण्यात आला. डांबरीकरणाऐवजी क्रॉंकीटीकरण करण्यात येणार असल्याने काम अर्धवट सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
क्रॉंकीटीकरण करा, आता एक लेअर टाका
रस्त्याचे क्रॉंकीटीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम आहे. तर डांबरीकरणाचे कामही याच विभागाकडे आहे. मक्तेदाराला रस्त्याच्या कामाचे पैसे मिळणारच आहेत. त्यामुळ क्रॉंकीटीकरण कराच; परंतु वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात निदान डांबरीकरणाचा एक लेअर टाकाच, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
"रेल्वे स्टेशन ते दूध फेडरेशन रस्ता ४२कोटीच्या निधीतून शंभर कोटीत वळविण्यात आला आहे. कॉंक्रिटीकरण होत असल्याची बाब चांगली आहे. पण, त्याचे काम होईपर्यत रस्त्यावर एक डांबरीकरणाचा लेअर टाका अशी मागणी आपण अनेक वेळा मक्तेदाराकडे व अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता लक्ष न दिल्यास आपण आंदोलन करणार आहोत." -ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.