Jalgaon Rain Damage : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा; आमदार किशोर पाटील यांचे आदेश

rain damage MLA Kishor Patil order to immediately report damage  jalgaon news
rain damage MLA Kishor Patil order to immediately report damage jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon Rain Damage : पाचोरा व भडगाव तालुक्यात रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळ व पावसामुळे शेतकरी बांधवांचे केळी, मोसंबी, लिंबू आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे खरीप हंगाम होण्यापूर्वीच शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडले आहे.

तसेच या वादळात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. शिवाय विजेचे खांब व तारा पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. (rain damage MLA Kishor Patil order to immediately report damage jalgaon news)

या बाबींची तत्काळ दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने सोमवारी पहाटेपासून तलाठी, ग्रामसेवका, कृषी सहाय्यक यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्यास सुरवात केली आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rain damage MLA Kishor Patil order to immediately report damage  jalgaon news
Jalgaon Rain Damage : शहरात 35 ठिकाणी तुटल्‍या विद्युत तारा; महावितरणकडून युद्धपातळीवर दुरूस्‍ती

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आलेल्या तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून वस्तुनिष्ठ पंचनामे करून घेण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

दोन दिवसात पंचनामे पूर्ण

या संदर्भात प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. त्वरित शासनास अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

rain damage MLA Kishor Patil order to immediately report damage  jalgaon news
Jalgaon Rain Damage : गिरणा परिसरात वादळी पावसाचा तडाखा; शेतांसह रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.