Lok Sabha Election : रावेर लोकसभा एकनाथ खडसेंनी लढवावी; जिल्हा राष्ट्रवादीतर्फे प्रस्ताव

eknath khadse and anil patil
eknath khadse and anil patilesakal
Updated on

Lok sabha Election : रावेर लोकसभा निवडणूक एकनाथ खडसे यांनी लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे. जळगाव लोकसभेसाठी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या नावाची शिफारस झालेली आहे.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रयत्नशील आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमार्फतच निवडणुका लढविण्यावर ठाम आहे. (Raver Lok Sabha should be contested by Eknath Khadse Proposal by District Nationalist jalgaon news)

मात्र ज्या भागात ज्या पक्षाचा जोर आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवार उभा करावयाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

स्वत;पक्षाचे नेते शरद पवार हे याबाबत माहिती घेत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दौराही याच चाचपणीसाठी असल्याचे सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघ पक्षाने गेल्यावेळी लढविले होते, यावेळी दोन्ही जागा लढविण्यासाठी पक्षाचा प्रयत्न आहे.

रावेरसाठी खडसेंचा प्रस्ताव

रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस तसेच महाविकास आघाडीतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांना उतरविण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना पक्ष नेत्याच्या बैठकित चर्चा झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

eknath khadse and anil patil
Loksabha Election: ८२ वर्षांचे माजी मुख्यमंत्री पुन्हा अॅक्टीव्ह! लोकसभेत काँग्रेसची व्होट बँक वाढणार का?

रावेर लोकसभेसाठी आमदार एकनाथ खडसे यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव जिल्ह्यातून देण्यात आला आहे. या बैठकित शरद पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यावेळी स्वतः खडसेही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

जळगावसाठी अनिल पाटील

जळगाव लोकसभेसाठी आमदार अनिल पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत या नावावरही चर्चा झाली. अनिल पाटील यांच्या नावाबाबत पक्षाची पूर्ण तयारी असल्याचे दिसून आले आहे. स्वत: आमदार पाटील यांचीही सहमती असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र तरीही पक्षातर्फे दुसऱ्या उमेदवारांची चर्चाही सुरू आहे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाबाबतही चर्चा सुरू आहे, मात्र देवकर जळगाव ग्रामीण विधानसभेसाठीच इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. चाळीसगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पक्षाचे जिल्हा समन्वयक विकास पवार यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

eknath khadse and anil patil
Loksabha Election : ‘भाजप’ च्या ‘सानप-आहेर’ लॉजिक ने कार्यकर्ते संभ्रमात

तर रावेरची ‘हायहोल्टेज’ लढत

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रावेर लोकसभेसाठी आमदार खडसे यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे, दुसरीकडे राज्याचे मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचीही जळगाव रावेर निवडणुकीबाबत चर्चा सुरू होती, त्यांचा पक्षातर्फे कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले मात्र जर पक्षनेतृत्वाने तोडीस तोड म्हणून दोन्ही नेत्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास राज्यात रावेर लोकसभा निवडणुकीची लढत ‘हायहोल्टेज’ठरण्याची शक्यता आहे.

"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जळगावात आलेले असताना जळगाव व रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत प्राथमिक चर्चा झाली.रावेर येथून आमदार एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारीचा पक्षातर्फे प्रस्ताव देण्यात आला आहे. तर जळगाव लोकसभेसाठी आमदार अनिल पाटील यांच्या नावाचाही प्रस्ताव आहे.मात्र उमेदवारीचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही." - ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉँग्रेस.

eknath khadse and anil patil
Loksabha Election : जागावाटपावरुन युतीत जुंपणार? शिंदे गटात अस्वस्थता, भाजपकडून कमळाचा प्रचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.