रावेरची अंतिम प्रभागरचना जाहीर; सर्व 15 हरकती फेटाळल्या

voting during election
voting during electionesakal
Updated on

रावेर (जि. जळगाव) : येथील पालिकेच्या (municipality) यापूर्वी जाहीर झालेल्या प्रभागरचनेला नाशिक विभागीय आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली आहे. याबाबतच्या सर्व १५ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी येथील पालिकेत पत्र देत प्रभागरचनेस (Ward Composition) अंतिम मान्यता देत असल्याचे कळविले आहे. (Ravers final ward composition announced All 15 objections rejected Jalgaon News)

प्रभागरचना करताना भौगोलिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्याही हरकती नागरिकांनी केल्या होत्या. जी. एस. काझी यांनी इमामवाड्याची ३ ठिकाणी वाटणी झाली असल्याचा आक्षेप घेतला होता. युसूफ इब्राहीम खान, सोयत अली आणि लियाकत अली, पद्माकर महाजन यांनीही याच आशयाची हरकत घेतली होती. शेख गयास यांनी घेतलेल्या आक्षेपात प्रभागरचना तयार करताना निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही, असे म्हटले होते. दिलीप पाटील यांनी प्रभाग १२ मध्ये तर एकनाथ महाजन यांनी प्रभाग २ मध्ये, धोंडू पासे यांनी प्रभाग १ ते १२ यांच्या रचनेतच आक्षेप घेतला होता. दिलीप जाधव, शैलेंद्र देशमुख, अरुण शिंदे, पंकज वाघ यांनीही अशाच प्रकारचे मुद्दे उपस्थित करत प्रभागरचनेवर आपल्या हरकती घेतल्या होत्या.

voting during election
रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांच्या महसुलात 518 टक्क्यांची वाढ

या सर्व हरकती जिल्हाधिकारी यांनी फेटाळून तशी शिफारस विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. तसेच पालिका मुख्याधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालाचाही आधार हरकती फेटाळताना घेतला असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रावेर पालिकेस २ जूनला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याबाबतचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र सोमवारी (ता. ६) सायंकाळपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांनी ‘सकाळ’ला दिली.

voting during election
बेपत्ता रोहितचा खून झाल्याचा संशय; पोलिसांना सापडला होता सांगाडा

राजकीय हालचाली गतिमान

आता अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्याने लवकरच मतदार यादी तयार करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या हालचाली पाहता नगरपालिका निवडणूक ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.