Raymond Case : रेमंडमधील वादाबाबत आयोजित बैठक रद्द; मंत्र्यांच्या भूमिकेबाबत संशय

Raymond controversy Meeting scheduled  was canceled jalgaon news
Raymond controversy Meeting scheduled was canceled jalgaon newsesakal
Updated on

जळगाव : रेमंडमधील (Raymond) कामगार संघटना व व्यवस्थापनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी कामगार मंत्र्यांच्या दालनात आयोजित बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. (Raymond controversy Meeting scheduled was canceled jalgaon news)

कंपनीने कामगारांना कामावर हजर होण्याबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर बहुतांश कामगार कामावर हजर झाले. मात्र, कामगार हितासाठी आयोजित बैठक ऐनवेळी रद्द केल्याने यात राजकारण झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यापासून रेमंडमधील कामगारांचे वेतन करारावरून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यातून कामगार संघटनांमधील वादही समोर आला. त्यामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण होऊन कलम १४४ लागू करण्यात आले. माजी महापौर तथा कामगार नेता ललित कोल्हेंवर गुन्हाही दाखल झाला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Raymond controversy Meeting scheduled  was canceled jalgaon news
Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या प्रश्‍नांबाबत आज मुंबईत होणार बैठक

हा विषय थेट विधिमंडळात गाजला. विधान परिषद सदस्य एकनाथ खडसेंनी लक्षवेधी मांडत मुद्दा उपस्थित केला. त्यावर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी २ वाजता त्यांच्या दालनात बैठक घेण्याची सूचना केली, त्यानुसार बैठकीचा अजेंडा निश्चित झाला. बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, खडसे यांच्यासह कामगार उत्कर्ष सभा,

खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. कामगार प्रतिनिधी मुंबईत हजर झाले होते. पण, ऐनवेळी ही नियोजित बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे कामगार हिताच्या निर्णयाचे क़ाय? यासह बैठक रद्द करण्यामागे काही राजकारण तर झाले नाही ना? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Raymond controversy Meeting scheduled  was canceled jalgaon news
Holi 2023 : ‘बेरंग’ बरसे... भरकटलेल्या ‘युवा’शक्तीचे बीभत्स वर्तन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.