Jalgaon News : शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेण्याची नाही गरज; वाढीव पीककर्ज पुरवठ्याची श‍िफारस

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅंकांच्या तांत्रिक समितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे.
Collector Ayush Prasad speaking in the meeting of Bank Technical Committee which provides agricultural loans to farmers.
Collector Ayush Prasad speaking in the meeting of Bank Technical Committee which provides agricultural loans to farmers.esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅंकांच्या तांत्रिक समितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे.

त्यात बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि मका प‍िकांसाठी पंचवीस, तर ऊस, कापूस आणि केळीसाठी दहा टक्के वाढीव कर्जपुरवठ्याच्या शिफारशीचा समावेश होता. (Recommendation for increased supply of crop credit from district collector ayush prasad jalgaon news)

शिफारशींची छाननी केल्यानंतर अंतिम निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीतर्फे घेण्यात येणार आहे. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात २०२४-२५ या हंगामासाठी प‍ीक कर्जदर ठरव‍िण्यासाठी ज‍िल्हास्तरीय तांत्रिक सम‍ितीची बैठक झाली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक ज‍ितेंद्र देशमुख, ‘नाबार्ड’चे ज‍िल्हा व‍िकास अध‍िकारी श्रीकांत झांबरे, लीड सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक प्रणवकुमार झा, कृषी व‍िज्ञान केंद्राचे व्यवस्थापक, केळी संशोधन केंद्राचे अध्यक्ष, सेंट्रल बँक ऑफ इंड‍ियाचे व्यवस्थापक, ज‍िल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषिभूषण समाधान पाटील, उद्यानपंडित रवींद्र माधवराव महाजन आदी उपस्थ‍ित होते. यावेळी सम‍ितीने वाढीव कृषी वित्तपुरवठ्याची श‍िफारस केली .

बँक कर्जासाठी प्रोत्साहन

शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता झाल्यास शेतीची मशागत, कापणीनंतरचा खर्च पूर्ण करण्यास मदत होणार आहे. सावकाराकडून शेतकऱ्यांना अधिक व्याजदराने कर्ज घेण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना एकाच बँकेकडून कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विक्री क्षमता सुधारण्यास आणि दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत शेतमाल पोहोचण्यास मदत होणार आहे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

‘अवजार बँक’ प्रोत्साहन

शेतकरी आधीच ट्रॅक्टरसारख्या भांडवली मालमत्तेचा मालक आहे असे मानण्याऐवजी, समितीने शिफारस केली आहे, की शेतकरी भांडवली मालमत्ता भाड्याने देऊ शकेल. भाड्याच्या खर्चाची तरतूद केल्याने उद्योजकांना ‘अवजार बँक’ स्थापन करण्यास प्रोत्साहन मिळेल.

Collector Ayush Prasad speaking in the meeting of Bank Technical Committee which provides agricultural loans to farmers.
Jalgaon News : तरसोद ते पाळधी ‘बायपास’चे काम मार्चअखेर पूर्ण होण्याबद्दल प्रश्‍नचिन्ह

यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देऊन उत्पादकता सुधारण्यास मदत होईल. शेत मजुरीची किंमत आपोआप वाढणार आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांना दिलासा मिळेल आणि जळगावमधून गेल्या अनेक वर्षांपासून वाढणाऱ्या स्थलांतराला आळा बसेल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

पाच हजार कोटींची क्षमता

जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठा करण्याची क्षमता पाच हजार कोटींहून अधिक आहे. परंतु, अडीच हजार कोटी रुपये मंजूर केले जातात. वित्तपुरवठ्याच्या चांगल्या प्रमाणामुळे जिल्ह्यातील बँकांना त्यांचे प्राधान्य क्षेत्रातील कर्ज लक्ष साध्य करण्यात मदत होईल. अडीच हजार कोटींची तफावत भरून काढण्यास मदत करीत जिल्ह्यातील ठेवींचे प्रमाण सुधारण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी आवश्यक भांडवल शोधण्यासाठी जिल्हा सहकारी बँक आणि इतर सहकारी बँकांच्या क्षमतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी इतर बँकांचा खर्च अधिक असेल.

श्री. प्रसाद यांनी जळगाव जिल्हा सहकारी बँकेने अनुसूचित व्यावसायिक बँकांसाठी ग्राहक सेवा केंद्र बनण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सुविधा सुधारण्यास मदत होईल आणि जिल्हा सहकारी बँकेला नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होईल.

Collector Ayush Prasad speaking in the meeting of Bank Technical Committee which provides agricultural loans to farmers.
Jalgaon News : शेतकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावला फलक; केळी पीकविमा रकमेसाठी ’वज्रमूठ’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.