Raver Blood Donation Camp : अखंड भारत दिनाचे औचित्य साधून येथील अंबिका व्यायामशाळेतर्फे आयोजित केलेल्या २६ व्या भव्य रक्तदान शिबिरात २७१ रक्तदात्यांनी विक्रमी संख्येने रक्तदान केले. रक्तदानासाठी रक्तदात्यांनी रांग लावली होती हे विशेष!
येथील पालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
(record number of 271 blood donors donated blood in blood donation camp jalgaon news)
सुरुवातीला भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सुरेश धनके यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र, जळगाव आणि संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर या दोन संस्थांनी रक्त संकलन केले. अंबिका व्यायाम शाळेच्या व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी रांगा लावून रक्तदान केले.
महिलांचे उत्स्फूर्त रक्तदान
यावेळी भाग्यश्री पाठक (रा. कर्जोद) यांनी आज असलेल्या आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहाव्यांदा या शिबिरात रक्तदान केले तर सायली अजनाडकर या युवतीनेही नियमित रक्तदानाची परंपरा आजही कायम राखली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याशिवाय मेघा भागवत, करुणा महाजन, लता महाजन यांच्यासह २१ महिलांनी या शिबिरात रक्तदान केले. परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरीक्षक सचिन नवले यांच्यासह पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांनी ही आज या शिबिरात रक्तदान केले.
या शिबिराला आमदार शिरीष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, युवा संत डॉ तुळशीराम गुट्टे महाराज, कन्हैयालाल अग्रवाल, अशोक वाणी, रवींद्र वानखेडे, अनिल अग्रवाल, दत्तप्रसाद दलाल, सुधाकर महाजन, हरीश गनवाणी, तहसीलदार बी ए कापसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पालिकेचे मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, लखमसी पटेल, राजन लासुरकर, योगेश गजरे यांनी भेटी दिल्या.
सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे, अशोक पाटील व विकास देशमुख यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व संयोजन अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन,उपाध्यक्ष रवींद्र महाजन, युवराज माळी, तुषार महाजन, गणेश महाजन, यशपाल परदेशी, प्रवीण कोळी, लीलाधर पाटील आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.