वीजचोरट्यांकडून कोटींचा दंड वसूल; 427 ‘फुकट्या’वर कारवाई

महावितरणच्या या कारवाईमुळे वीज चोरट्यांची संख्या घसरणीवर आली आहे.
Electricity Power theft case
Electricity Power theft case sakal
Updated on

जीवन चव्हाण : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : ‘आकडे’ टाकून व मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या एकूण सहाशे वीज चोरट्यांवर ‘महावितरण’ने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापैकी ४२७ वीजग्राहकांकडून एक कोटी दहा लाखांचा दंड महावितरणने वसूल केला असून, ग्रामीण पोलिसात दहा वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Electricity Power theft case
शिंदे सरकारमधील मंत्री सावंत सोलापूर दौऱ्यावर! बार्शीतून थेट भूम-परांड्याला जाणार

राज्यात सध्या वीज गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी महावितरणकडून वीज चोरट्यांविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात धडक मोहीम सुरू आहे. यात ‘आकडे', मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात देखील ही मोहीम मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल ते जुलै-२०२२ मध्ये प्रभावीपणे राबविण्यात आली.

या दरम्यान ६०५ वीज चोरट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तीन महिन्यात एकूण १० लाख २९ हजार ५४५ युनिट वीजचोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या युनिटची एकूण रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्यापैकी ४२७ वीजग्राहकांकडून एक कोटी दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात १० वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी यामध्ये बहुतेकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची माहीती मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी ‘सकाळ'शी बोलतांना सांगितले आहे.

Electricity Power theft case
वीज चोरी करताना दुसऱ्यांदा पकडले

महावितरणच्या या कारवाईमुळे वीज चोरट्यांची संख्या घसरणीवर आली असून, अनेक गावे आता ‘आकडेमुक्ती'कडे वाटचाल करीत आहेत. हेच रोलमॉडेल आता जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. दरम्यान, याचे श्रेय फक्त मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांना दिले जात आहे.

''वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अधिकृत मीटरधारकांनी आपल्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी न करता नियमित विजेचा वापर करावा व नेहमी येणारे वीजबिल भरणा करून सर्व वीज ग्राहकांनी सन्मानाने जगावे.'' - संदीप शेंडगे, मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, चाळीसगाव

Electricity Power theft case
पत्नीच्या आजारपणामुळे ‘तो’ बनला चोर! ५२ व्या वर्षी चोरल्या १० दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.