Bank Recruitment : पाचोरा पीपल्समध्ये 5 महिन्यात नोकर भरती

bank Recruitment
bank Recruitmentesakal
Updated on

Jalgaon News : येथील पीपल्स बँकेत येत्या पाच महिन्यात शासनाच्या धोरण व नियमानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (recruitment process of permanent employees will be completed in next 5 months in People Bank pachora jalgaon)

बँकेच्या सभागृहात मंगळवारी (ता. १६) सकाळी ॲड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अस्मिता पाटील, ॲड. अविनाश भालेराव, जीवन जैन, प्रा. भागवत महालपुरे, ॲड. स्वप्नरल पाटील, देवेन कोटेचा, अविनाश कुडे आदी संचालक उपस्थित होते.

बँकेचे ठेवीदार तथा मार्गदर्शक संदीप महाजन यांनी बँकेने त्वरित कायमस्वरूपी नोकरभरती करावी. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर बँक चालवू नये. बिंदू नामावलीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ॲड. संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bank Recruitment
High Salary Jobs: मुलांना या काही गोष्टी शिकवल्यात तर त्यांना भविष्यात मिळेल भरगोस पगाराची नोकरी

त्यांनी स्पष्ट केले की, बँकेत कर्मचारी भरती करण्याचे प्रयत्न केले, परंतु राज्य शासनाचे आदेश व रिझर्व बँकेच्या नियमानुसार भरती करणे शक्य झाले नाही. करार पद्धतीवर आवश्यक तेवढे कर्मचारी घेतले. यापूर्वी कोणताही करार नसताना बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी बंद केले. करार करून मानधनावर कर्मचारी नियुक्त केले.

या आर्थिक वर्षात बँकेचा नफा, खेळते भांडवल व कर्मचारी संख्या विचारात घेता राज्य शासन व रिझर्व बँकेच्या नियम व चौकटीनुसार कर्मचारी भरती करणे शक्य झाले असल्याने कर्मचारी भरतीप्रक्रिया येत्या पाच महिन्यात पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच कर्ज वसुलीचे समान व कठोर धोरण अवलंबिल्याने शून्य टक्के एनपीए उद्दिष्ट गाठण्यात आले असून येत्या तीन महिन्यात बँकेत सर्व अत्याधुनिक सुविधा पूर्ण करण्यात येणार आहेत. डॉ. अस्मिता पाटील, ॲड. अविनाश भालेराव, जीवन जैन यांनीही पत्रकार परिषदेत बँकेच्या विविध उपक्रमांसंदर्भात माहिती दिली. ॲड. अविनाश भालेराव यांनी आभार मानले.

bank Recruitment
Job Opportunities: खुशखबर! या वर्षी देशातील ७७ टक्के कंपन्या करणार मेगाभरती, नवीन जागा होणार तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.