Jalgaon RTO Office : जळगावात आरटीओ कार्यालय; पालकमंत्र्यांनी पाळला शब्द

Regional Transport Officer RTO office has been approved at Jalgaon news
Regional Transport Officer RTO office has been approved at Jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon RTO Office : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी (ता. २३) जळगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ कार्यालयास मंजुरी मिळाली आहे.

यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी धुळे येथे जाण्याचा त्रास वाचणार आहे. (Regional Transport Officer RTO office has been approved at Jalgaon news)

गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे. शुक्रवारपासून जळगावचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतरित झाले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा केला असून, कॅबिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता.

आरटीओ, एमआयडीसी आणि वन खाते यांची विभागीय कार्यालये धुळे येथे असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना या खात्यांच्या कामांसाठी धुळे येथे जावे लागत होते. या अनुषंगाने या तिन्ही खात्यांची कार्यालये जळगावला व्हावीत, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला. यातील पहिला प्रश्‍न मार्गी लागला आहे.

राज्य शासनाने शुक्रवारी नवीन प्रादेशिक कार्यालयांची यादी जाहीर केली असून, यात जळगावसह राज्यातील ९ ठिकाणी डेप्युटी आरटीओ कार्यालयांचा दर्जा वाढला असून, त्याचे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर केले आहे. ९ डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुरीचा आदेश शासनाने २३ जूनला जारी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Regional Transport Officer RTO office has been approved at Jalgaon news
Inspirational News : पाचशेवर वंचित मुलांना आनंददायी बालपण! वर्धिष्णूच्या ‘आनंदघर’ची दशकपूर्ती

त्यात जळगाव, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) व सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. या शासन निर्णयामुळे जळगाव येथे शुक्रवारपासून एआरटीओ नव्हे, तर आरटीओ कार्यालय अस्तित्वात आले आहे.

या सर्व कार्यालयांमध्ये शासनाने चार हजार ११६ नियमित, तर २०४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्याचा आकृतिबंध मंजूर केला आहे. शुक्रवारी पदांचा सुधारित आकृतिबंधही मंजूर झाला आहे. या कार्यालयामुळे ड्रायव्हिंग स्कूलच्या मान्यतेसह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी धुळ्याला जाण्याचा हेलपाटा वाचणार असून, जळगावच्या कार्यालयात या सेवा उपलब्ध होणार आहेत.

नव्या निर्णयानुसार जळगाव येथील आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी १, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी १, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, मोटार वाहन निरीक्षक २४, लेखाधिकारी १, प्रशासकीय अधिकारी १, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ३०, लघुलेखक (निम्नश्रेणी) १, कार्यालय अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक १०, लिपिक टंकलेखक २०, वाहनचालक ४, असे एकूण १०० पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर झाला आहे.

"या प्रश्‍नाचा सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात अनेकदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्‍नही उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अनुकुलता दर्शविल्यामुळे जळगावात आरटीओ कार्यालय मंजूर झाल्याने मला मनस्वी आनंद आहे." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Regional Transport Officer RTO office has been approved at Jalgaon news
Eknath Khadse : कापूस भाव, पाणीटंचाईवर निर्णय घ्या : एकनाथ खडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.