NAFED Gram Purchase : शेतकऱ्यांनी रात्र काढली जागून; तासाभरात 600 शेतकऱ्यांची नोंदणी

Farmers queuing up for online gram registration outside the entrance of Kithi Sangh since midnight.
Farmers queuing up for online gram registration outside the entrance of Kithi Sangh since midnight.esakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : बाजारभावापेक्षा शासकीय (Govt) खरेदीत दोन पैसे जास्त मिळतील, या अपेक्षेने प्रथम नोंदणी करण्यासाठी तालुक्यातील ५० शेतकऱ्यांनी डासांची, गटारीच्या दुर्गंधीची

पर्वा करता शेतकी संघाबाहेरच रस्त्यावर गटारीच्या बाजूला अंथरूण टाकून अर्धवट जागत मंगळवारची (ता. २८) रात्र काढली. (Registration of 600 farmers within an hour to buy gram from Amalner In Government Procurement jalgaon news)

दुसऱ्या दिवशी सकाळी एका तासात ६०० शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली. बाजारात हरभऱ्याला ४१०० ते ४२०० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळतो. मात्र नाफेडच्या शासकीय खरेदीत ५ हजार ३३५ रुपये भाव जाहीर झाल्याने पोटासाठी दोन पैसे जास्त मिळतील, या अपेक्षेने नोंदणीची नोटीस जाहीर होताच मंगळवारी (ता. २८) शेतकऱ्यांनी शेतकी संघाबाहेर रस्त्यावर गटारीच्या शेजारीच बस्तान मांडले होते.

सुरवातीला नंबर लावला नाही तर व्यापारी गर्दी करतात किंवा शासकीय खरेदी बंद होते म्हणून शेतकरी एका कागदावर क्रमाने नाव लिहून त्याच ठिकाणी क्रमवार अंथरूण टाकून लोळले होते. नंबर मागे पुढे होऊ नये म्हणून रात्रभर अर्धवट जागरण करीत रात्र काढली.

शासनाने हेक्टरी साडेतेरा क्विंटल मर्यादा जाहीर केली आहे. सकाळी आठला नोंदणीला सुरवात झाली आणि शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी क्रमवारी टोकन देऊन कागदपत्रे जमा करून घेतली. त्यांनतर कार्यालयात संगणकावर ऑनलाइन नोंदणी केली. दरम्यान, बुधवारी (ता. १) सकाळी ८ ते ९ या एका तासाच्या वेळेत तब्बल ६०० जणांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Farmers queuing up for online gram registration outside the entrance of Kithi Sangh since midnight.
Jalgaon News : महसूल विभागाची वसुली शंभर टक्के करा; जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना

चोपड्यात ऑनलाइन नोंदणी

चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात गुरुवारपासून (ता. २) हरभरा नोंदणीस सुरवात होत आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम २०२२/२०२३ चा ऑनलाइन हरभरा पीकपेरा लावलेला तलाठी यांच्या सहीचा सात/बारा उतारा, बँक पासबुक झेरॉक्स (खाते क्रमांक व आयएफएससी कोड सुस्पष्ट), आधारकार्डची फोटोकॉपी,

मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांसह गुरुवारी (ता. २) सकाळी आठपासून शेतकी संघाच्या कार्यालयात जमा करून ऑनलाइन नोंदणी करावी. शासकीय हमीभाव हरभरा ५ हजार ३३५ प्रतिक्विंटल आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकी संघाचे प्रेसिडेंट दुर्गादास पाटील व संचालक मंडळाने केले आहे.

Farmers queuing up for online gram registration outside the entrance of Kithi Sangh since midnight.
Jalgaon News : रेमंड कामगारांचा रोजगार अडकला टाळेबंदीत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.