अमळनेरात अवैध धंद्यांचे अतिक्रमण हटवले

जुगार अड्ड्यांसह इतर अवैध धंदेवाल्यांनी केलेले अतिक्रमण आज कारवाई करुन हटवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
jalgaon news
jalgaon news esakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : येथील नगरपरिषदेच्या शासकीय शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जुगार अड्ड्यांसह इतर अवैध धंदेवाल्यांनी केलेले अतिक्रमण आज कारवाई करुन हटवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या ठिकाणी दारू, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सर्रास सुरु होते.

मच्छी बाजारात सट्ट्याच्या पिढ्यांची संख्या जास्त होती. सानेगुरुजी मार्केटमध्ये देखील जिन्याच्या खाली अतिक्रमण करून जुगार चालवला जात होता. त्यामुळे येथील अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. पालिकेच्या प्रशासक सीमा अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी संयुक्तरित्या पालिकेच्या मालमतेच्या आवारातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, अविनाश बिऱ्हाडे, जगदीश बिऱ्हाडे, यश लोहरे, विशाल सपकाळे, जयदित्य गजरे, सुरेश चव्हाण, भूषण चव्हाण, विकास बिऱ्हाडे, रफीक खान, जितेंद्र चावरे यांच्या पथकाने अतिक्रमित झोपड्या, ओटे, शेड तोडून येथील सट्टा, मटका जुगाराचे अड्डे उद्ध्वस्त केले. पालिकेने केलेल्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

jalgaon news
Jalgaon : नगरदेवळ्यातील बंद सुतगिरणी बनली जुगाराचा अड्डा
jalgaon news
महिलांच्या छेडखानीसाठी शिट्ट्या वाजवल्याने धुमश्‍चक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.