Rajya Natya Spardha 2023 : सशक्त संहितेचे संथ सादरीकरण : थेंब थेंब आभाळ

Moments from the play 'Themb Themb Abhal'
Moments from the play 'Themb Themb Abhal'esakal
Updated on

Rajya Natya Spardha 2023 : पाणी ही मानवी जीवनातील अत्यंत निकडीची गरज आहे; परंतु भौगोलिक कारणांनी म्हणा किंवा पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागते.

पाणीटंचाईत सर्वांत होरपळला जाणारा घटक म्हणजे शेतकरी. (rendition of strong code themb themb abhal drama rajya natya spardha 2023 jalgaon news)

पाणी हा विषय मध्यवर्ती घेऊन गावगाड्याची संस्कृती, गावातील कारभार आणि सावकाराकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक या विषयावर अविरत इंदूर यांनी प्रा. दिलीप परदेशी लिखित अभिनय देशमुख दिग्दर्शित ‘थेंब थेंब आभाळ’ हे नाटक महाराष्ट्र शासनाच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे पहिले पुष्प गुंफताना येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर केले.

दुष्काळी गावातील ग्रामस्थांना आपल्या आर्थिक बळावर सावकार वेठीला धरतो. पैशांबरोबर पाणीही पुरविणार, त्यामुळे वसुलीच्या नावावर एखाद्या बाईच्या पदरालाही त्याने हात घातला तरी गावकऱ्यांना काही करता येत नाही.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असतानाच, या अन्यायाविरोधात पेटून उठून गावातील शिवाप्पा आणि त्याचे कुटुंब आपल्या शेतात विहीर खोदून या सावकाराला आव्हान देतात. विषय सशक्तपणे मांडलेल्या या संहितेचे सादरीकरण संथ झाल्याने, मात्र प्रयोग रंगला नाही.

दिग्दर्शक अभिनय देशमुख यांनी तंत्रज्ञांवर केलेल्या मेहनतीपेक्षा कलावंतांच्या वाचिक अभिनयाकडे व नाटकाच्या लयीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे होते. लेखकाने दिलेल्या प्रभावी शब्दांना कलावंतांचा अभिनय प्रवाही करीत असतो. मात्र, पाठांतराचा अभाव आणि नाटकाची गती कायम न राखल्याने प्रयोग संथ झाला. परिणामी, अपेक्षित परिणाम गाठू शकला नाही.

Moments from the play 'Themb Themb Abhal'
Rajya Natya Spardha: अनिष्ट रुढींची वास्तविकता मांडणारे : ‘संगीत अवघडीचे पाच दिवस’

कलावंतांमध्ये सीमा देशमुख यांची रुक्मा, तर किरण आचार्य यांचा नाना सावकार हे लक्षात राहण्याजोगे; तर त्यांना साथ दिली शिवाप्पा (राजन देशमुख), धना (अभिनय देशमुख), परीगा (योजना दिघे), राप्पा (तल्लीन दिघे), गावकरी (राजन फडणीस, पंकज बोडस, किशोर वानखेडे, अजय देशमुख, पर्णिका बोडस, ममता बोडस, जेवियर खालको), मधाजी (संजीव दिघे), रामोशी (शंतनू हंडियेकर), हलगीवाला (प्रमोद पाटणकर), लेझीमवाला (दिलीप नजाण) यांनी.

तंत्रज्ञांमध्ये प्रखर मौर्य यांचे नेपथ्य व प्रकाशयोजना नाट्यास पोषक अशीच. त्यांना नेपथ्य सहाय्य वेदांत लक्रस; तर रंगमंच व्यवस्था शिल्पा हंडियेकर यांची होती. वेदांत लक्रस यांचे ध्वनी संयोजन, कीर्ती प्रधान यांची रंगभूषा, रेवती देशमुख यांची वेशभूषा नाट्यास पूरक अशीच.

Moments from the play 'Themb Themb Abhal'
Rajya Natya Spardha: दत्तक पद्धतीची नवी संकल्पना 'स्मरणार्थ'

राज्य शासनाच्या हौश मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मेहनतीने साकारलेल्या नाट्यप्रयोगाबद्दल अविरत इंदूर या संस्थेच्या कलावंत व तंत्रज्ञांचे अभिनंदन.

आजचे (ता. २६) नाटक

* ‘संपेल का कधीही हा खेळ सावल्यांचा’

* लेखक- रमेश भोळे

* सादरकर्ते- दिशा समाजप्रबोधन बहुउद्देशीय संस्था, जळगाव

Moments from the play 'Themb Themb Abhal'
Rajya Natya Spardha 2023: दीड शतकांचा सामाजिक प्रवास उलगडणारा ‘विदूषक’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.