Jalgaon News : पिंप्राळा पुलाजवळील शाहूनगर भागातील जुनी मनपा ऊर्दू शाळा ते पुलापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे.
या रस्त्यावरून जाणेही कठीण झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्यावर आता तात्पुरती दुरुस्ती सुरू केली आहे.(Repair of road in Shahunagar near Pimprala Bridge jalgaon news)
शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपकडून शाहूनगर भागातून पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे महापालिकेने नुकतेच काँक्रिटीकरण केले आहे. मात्र ते अर्धवटच केले आहे. गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगरमधील जुन्या महापालिकेच्या ऊर्दू शाळेपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. शाळेपासून तर पुढे पिंप्राळा उड्डाणपुलापर्यंतचे काम सोडून देण्यात आले आहे.
या भागातील रस्ता अत्यंत खड्डेमय आहे, तसेय याच ठिकाणी महापालिकेची जलवाहिनीही लिकेज झालेली आहे. ते पाणीही त्याच खड्ड्यात साचलेले असल्याने त्या ठिकाणी पाण्याचे तळे तयार झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालविणेही कठीण झाले होते. विशेषत; दुचाकी वाहनधारकांचे किरकोळ अपघातही झाले होते. या रस्त्यात्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्याची दखल महापालिकेच्या बांधकाम विभागाने घेतली. त्याबाबत शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी सांगितले, की या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. परंतु तोपर्यंत लवकरच रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे करण्यात येईल. त्यानुसार महापालिकेने आता या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली असून, मुरूम टाकून काम करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी असलेले जलवाहीनीचे लिकेजही काढण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.