Jalgaon : काढणी पश्चात पिकांचे नुकसान 72 तासांत कळवा; जिल्हाधिकारी मित्तल यांचे आवाहन

crops after harvest
Report the damage within 72 hours
crops after harvest Report the damage within 72 hoursesakal
Updated on

जळगाव : खरीप हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक स्थानिक आपत्तीमुळे व काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.

‘प्रधानमंत्री पीकविमा योजना-२०२२-२३’ खरीप हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी एआयसी विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबीकरिता ज्या पिकांची कापणी/काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) अतिपावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून व निकषांचे अधीन राहून नुकसानभरपाई निश्चित केली जाते.(Report crop damage within 72 hours after harvest Collector Mittal appeal Jalgaon News)

crops after harvest
Report the damage within 72 hours
Jalgaon : नवीन बसस्थानकात आढळला मृतदेह

विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी आग किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यास या नैसर्गिक स्थानिक आपत्तीमुळे पीक नुकसानग्रस्त झाल्यामुळे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात नेईल.

पीकविमाधारक शेतकऱ्यांचे अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकाद्वारे, मोबाईल अॅपद्वारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात/तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइनद्वारे देणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.

crops after harvest
Report the damage within 72 hours
Jalgaon Crime News : शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.